Leader Highway Viral Video : नेत्यासोबत हायवेवर शारीरिक संबंथ, VIDEO मधील महिलेविषयी मोठी माहिती पोलिसांच्या हाती

Manoharlal Dhakad Viral Video : मंदसौर पोलिसांनी याविषयी माहिती देत खुलासा केला की, व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यासाठी कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे गोळा केले आहेत.
Manoharlal Dhakad Viral Video
Manoharlal Dhakad Viral VideoSaam Tv News
Published On

मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौर येथील दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर भाजपचा निकटवर्ती मनोहरलाल धाकडचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय. संबंधित प्रकरणात अश्लील कृत्य करणाऱ्या महिलेचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मैंदसोर पोलीस फिल्डींग लावत तरुणीच्या मागावरच आहेत. अशातच तरुणीचे कॉल रेकॉर्ड आता पोलिसांकडे आल्यानं तिच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे.

मंदसौर पोलिसांनी याविषयी माहिती देत खुलासा केला की, व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यासाठी कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल आणि भारतीय दंड संहितेच्या कलम २९६, २८५ आणि ३/५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी या प्रकरणात तरुणीला ताब्यात घेण्यासाठी मोठा प्लॅन रचला आहे.

Manoharlal Dhakad Viral Video
Ahmedabad Plane Crash : शेतकरी बापानं कर्ज काढून मुलाला शिकवलं, लेक मोठ्ठा डॉक्टर होणार; पण विमान अपघातात सारं हिरावलं

नेमकं काय होतं प्रकरण?

मे महिन्यात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवीलर एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत भाजप नेता मनोहरलाल धाकड आणि एक तरुणी दोघेही अश्लील कृत्य करताना दिसत होते. या व्हिडिओमुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, व्हायरल झालेल्या घटनेची देशभर चर्चा झाली होती. अशावेळी विरोधकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मंदसौर पोलिसांनी कारवाई केली आणि मनोहरलाल धाकड याच्याविरोधात बीएनएसच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. परंतु न्यायालयानं त्याचा जामीन मंजूर केला. यानंतर व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेला एका महिन्याहून अधिकचा कालावधी गेलाय. परंतु व्हिडिओत अश्लील वर्तन करणाऱ्या महिलेला अटक करण्यात यश आलं नाही. दरम्यान, पोलिसांकडू तरुणीची शोधमोहीम सुरुच आहे.

Manoharlal Dhakad Viral Video
Ahmedabad Plane Crash : शेतकरी बापानं कर्ज काढून मुलाला शिकवलं, लेक मोठ्ठा डॉक्टर होणार; पण विमान अपघातात सारं हिरावलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com