Uttar Pradesh Meerut Ganeshpur Crime News Saam TV
क्राईम

Crime News : डोक्यावर बंदूक रोखली, धाड धाड गोळ्या झाडल्या; १७ वर्षीय पुतण्याने केली मावशीची हत्या

Uttar Pradesh Meerut Ganeshpur Crime News : उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन पुतण्याने मावशीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा त्यागी यांचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पुतण्या फरार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये १७ वर्षीय पुतण्याने केली मावशीची हत्या

  • ही घटना मेरठ जिल्ह्यातील गणेशपूर गावात घडली

  • आरोपी मुलगी घटनास्थळावरून फरार

  • पोलिस पुढील तपास करत आहेत

Uttar Pradesh Meerut Aunt Murder By Nephew उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन पुतण्याने घरात बसलेल्या मावशीवर धाड धाड गोळ्या झाडून हत्या केली. या दुर्घटनेत पीडितेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस खोल तपास करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी. तसेच आरोपी मुलाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. सदर घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे नाव शिवा असे असून मृत महिलेचे नाव पूजा त्यागी असे आहे. सदर घटना उत्तर प्रदेश मधील मेरठ जिल्ह्यातील गणेशपूर गावात आज म्हणजेच ५ फेब्रुवारी गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. पूजा त्यागी ही शिवाची नात्याने मावशी होती. आज सकाळी त्या घरात एकट्या असताना शिवाने मागून येऊन त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखली.

घरात कोणीही नसल्याची संधी साधून शिवाने त्याच्या मावशीवर धाड धाड गोळ्या झाडल्या. या आवाजाने आजूबाजूचे नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत शिवाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. घडलेल्या घटने प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

तसेच आरोपी शिवा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून हे हत्येचं मूळ कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पोलीस शिवाचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या धक्कादायक घटनेनंतर इतक्या लहान वयात मुलांच्या हातात बंदूक येते कशी? असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT