Crime News  x
क्राईम

Crime : कामाच्या निमित्तानं बोलावलं अन्...; मदरशातच शिक्षिकेसोबत भयंकर घडलं, मदरसा संचालकाचं धक्कादायक कृत्य

Crime News : एका मदरसा संचालकाने शिक्षिकेला कामाच्या निमित्ताने मदरशात बोलावले. जबरदस्ती करत शिक्षिकेवर अत्याचार केला. त्यानंतर हा संचालक मदरशातून पळून गेला. शिक्षिकेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपी संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yash Shirke

उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील फतेहगंज पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण घटना उघडकीस आली आहे. एका मदरसा संचालकाने शिक्षिकेवर बलात्कार केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी मदरसा संचालकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव जुबेर असे आहे. जुबेरने कामाच्या बहाण्याने शिक्षिकेला मदरशात बोलावले. त्यानंतर जुबेरने शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केले. पीडित शिक्षिका वेळेवर घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी शिक्षिकेचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना पीडिता मदरशात बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिचे कपडे विस्कटलेले, फाटलेले होते.

त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी फतेहगंज पश्चिम पोलीस स्थानक गाठले आणि पोलिसांना घडलेला संपूर्ण प्रकार समजावला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीच्या विरुद्ध कारवाई सुरु केली. यादरम्यान आरोपी जुबेर फरार होता. त्याला पकडून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार जुबेरला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

मदरसामध्ये काम करत असलेल्या शिक्षिकेवर मदरसा संचालकाने लैंगिक अत्याचार केले. ती बेशुद्ध अवस्थेत मदरशामध्ये आढळली होती. त्यानंतर शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली. पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने फरार आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

SCROLL FOR NEXT