boy Dance teacher phisically assaults at summer camp Saam Tv News
क्राईम

Ulhasnagar Crime : समर कॅम्पमध्ये चिमुकल्यासोबत संतापजनक प्रकार, डॉक्टरांकडे नेताच आई-वडील हादरले, डान्स टीचरनेच...

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील कुर्ला कॅम्प परिसरात एका प्ले स्कूलमध्ये उन्हाळी सुट्टीत समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. या समर कॅम्पला उल्हासनगरमधील एका अडीच वर्षीय चिमुकल्याला त्याचे पालक पाठवत होते.

Prashant Patil

ठाणे (उल्हासनगर) : ठाण्यातील उल्हासनगरमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. समर कॅम्पमधील डान्स टीचरनं हे दुष्कृत्य केलं असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत या नराधम डान्स टीचरला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडालीये. १५ मे आणि २१ मे रोजी या टीचरनं चिमुकल्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ज्यावेळी आई वडिलांनी मुलाला त्रास होत असल्यानं डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील कुर्ला कॅम्प परिसरात एका प्ले स्कूलमध्ये उन्हाळी सुट्टीत समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. या समर कॅम्पला उल्हासनगरमधील एका अडीच वर्षीय चिमुकल्याला त्याचे पालक पाठवत होते. या चिमुकल्यावर १५ मे आणि २१ मे अशा दोन वेळा तिथे डान्स टीचर म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र दुलानी या नराधमाने लैंगिक अत्याचार केले. यानंतर मुलाला त्रास होऊ लागल्याने पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं.

त्यामुळे हादरलेल्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन गाठत नराधम जितेंद्र दुलानी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तातडीने या नराधमाला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केलं असता, ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT