Ulhasnagar News Saam tv
क्राईम

Ulhasnagar News : उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर नशेखोर युवकांचा दोघांवर हल्ला; एक जण गंभीर जखमी

Ulhasnagar crime news : उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा हा स्कायवॉक नशेखोर युवकांचा अड्डा झाला आहे. याच स्कायवॉकवर दहा ते बारा जणांनी दोन मित्रांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

उल्हासनगर : मध्य रेल्वेवरील उल्हासनगर रेल्व स्टेशनवर नेहमी वर्दळ असते. या रेल्वे स्टेशनवरून हजारो प्रवासी प्रवास करत असतात. उल्हासनगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी स्कायवॉक देखील बांधले आहेत. मात्र, उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा हा स्कायवॉक नशेखोर युवकांचा अड्डा झाला आहे. याच स्कायवॉकवर दहा ते बारा जणांनी दोन मित्रांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर रेल्वे स्टेशन बाहेर असलेला स्कायवॉक हा गुंडगिरीचा आणि नशेखोर मुलांचा अड्डा झाल्याचे दिसत आहे. याच स्कायवॉकवर दोन मित्र गप्पा करीत बसले होते. त्यावेळी काही अज्ञात दहा ते बारा मुलांनी येऊन दोघां मित्रांकडे मोबाईल आणि पैशांची मागणी केली. तेव्हा त्या दोन मित्रांनी विरोध केल्यावर दहा ते बारा जणांनी स्कायवॉकवर बसलेल्या दोन मित्रांवर हल्ला केला.

नशेखोर या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. अख्तर शेख हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरा मित्र मुकेश कोळी याच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

उल्हासनगरच्या स्कायवॉकवरील ही पहिली घटना नाही. यापूर्वी एका हवलदारावरही नशेखोर मुलांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डोंबिवलीत मेडिकल चालकाला बेदम मारहाण

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराला रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. ओआरएस द्यायला थोडासा वेळ लागल्याने संतापलेल्या ग्राहकाने मेडिकल चालकाला मारहाण केल्याची घटना केली. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

SCROLL FOR NEXT