Jalna Crime News Saam TV
क्राईम

Jalna Crime News : महिलांच्या शरीराला झाडूने स्पर्श करून उपचार; जालन्यातील भोंदू बाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Crime News : महिलेच्या तक्रारीवरून भोंदू बाबाविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही जालना

झाडूने महिलाच्या शरीराला स्पर्श करुन उपचार करणारा बाबा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. महिलेच्या तक्रारीवरून भोंदू बाबाविरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकरदन तालुक्यातील चांदेकर येथील सोमीनाथ महाराज ढाकणे उर्फ गुणवंत बाबा यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन एक महिला आली होती. या महिलेने आपल्या समस्या सांगितल्यानंतर बाबांनी या महिलेच्या शरीराला झाडूने स्पर्श करत तुमच्यावर बाहेरची हवा आहे, असं सांगितलं.

त्यानंतर या महिलेच्या संपूर्ण शरीराला झाडूने स्पर्श केला होता. या महिलेला हा स्पर्श मान्य नसल्याने महिलेने बाबाला असं का करता म्हणत या स्पर्शबाबत बाबाला जाब विचारला. बाबा नी रक्षा मिश्रित पाणी महिलेच्या अंगावर शिंपडून तुम्हाला या बाहेरच्या हवेपासून सुटका मिळण्यासाठी सात वेळा येथे फिरण्यास सांगितले.

त्यानंतर या बाहेरच्या हवेपासून तुमची सुटका होईल असं म्हणताच महिलेने पुन्हा या बाबाच्या अघोरी पद्धतीला विरोध करत बाबाला जाब विचारला होता. बाबाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या महिलेने हसनाबाद पोलीस स्टेशन गाठले. तसेच बाबा विरुद्ध तक्रार दाखल केली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदर बाबा हा महिलांच्या अंगाला झाडूने स्पर्श करून उपचार करत असल्याचं सत्य समोर आलं. त्यानंतर जालन्यातील हसनाबाद पोलिसांनी तात्काळ अघोरी उपचार करणाऱ्या बाबाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला.याप्रकरणी अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT