Kalyan News Saam Tv
क्राईम

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Kalyan Crime News : कल्याण शहरात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. कुख्यात गुंडांनी माजी नगरसेवकांना धमकी दिल्यानंतर पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. नागरिक या गुंडांमुळे त्रस्त झाले आहेत.

Alisha Khedekar

  • कल्याण शहरात कुख्यात गुंड फिरोज मेंटल आणि तौसीफ सय्यदची गुंडशाही कारभार

  • महिलांची छेडछाड, मारहाण, दागिने हिसकावणे यासारख्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत

  • या गुंडानी माजी नगरसेवकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे

  • नागरिकांनी या गुंडांविरोधात तक्रार दाखल केली आहे

  • पोलिसांनी तातडीने अटक करून परिसरात शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याण शहरातील वालधुनी परिसर पुन्हा एकदा दहशतीच्या सावटाखाली आला आहे. परिसरात कुख्यात गुंड फिरोज खान उर्फ फिरोज मेंटल आणि त्याचा साथीदार तौसीफ सय्यद यांच्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दोघांकडून महिलांची छेड काढणे, रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना विनाकारण मारहाण करणे, तसेच कोणाचेही दागिने हिसकावून घेण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे.

या गुंडगिरीविरोधात नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे आता राजकीय व्यक्तींनाही धमक्या दिल्या जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी या दोघांविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

यासंदर्भात माजी नगरसेवक चव्हाण यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिरोज मेंटल हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी विश्वातील ओळखलेले नाव असून, त्याच्यावर बलात्कार, अपहरण, खंडणी, हत्या अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत. तरीही तो आणि त्याचे साथीदार मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

या घटनेनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले असून, फिरोज मेंटल आणि तौसीफ सय्यद यांच्या शोधासाठी पोलीसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या दोघांच्या अटकेची मागणी करत पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोल्यात धक्कादायक निकाल; भाजपचे ५० नगरसेवक विजयी; काँग्रेस, वंचित अन् ठाकरेसेनेला किती जागा? पाहा आकडेवारी

Chandrapur Election: पाच आमदार असूनही चंद्रपुरात भाजप फेल; काँग्रेसचा दणदणीत विजय

बारामतीत बसपाचा 'हत्ती' सुसाट; अवघ्या २१ वर्षांची तरुणी नगरसेवक बनली

India Vs Pakistan: दुबईत अंडर-19 आशिया कप फायनलमध्ये भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये तुफान वाद, नेमकं काय घडलं? वाचा प्रकरण...

Konkan Tourism : रत्नागिरीत लपलाय सुंदर किनारा, अनुभवाल कोकणातील अस्सल सागरी सौंदर्य

SCROLL FOR NEXT