Crime news saam tv
क्राईम

Crime news: भर रस्त्यात पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला; बॉयफ्रेंडसोबत अनैतिक संबंधाला विरोध केल्याने हल्ला

आग्राच्या रुनकता परिसरात कौटुंबिक वादातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीवर गंभीर हल्ल्याचा आरोप असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आग्रा जिल्ह्यातील रुनकता परिसरातून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आलीये. कौटुंबिक वाद, संशय यामुळे पत्नीचे पत्नीचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापल्याची थरारक घटना घडलीये. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार रस्त्यावर घडला आहे. या प्रकरणातील पीडित युवक हा मूळचा एटा जिल्ह्यातील सकीट भागातील रहिवासी आहे.

हा तरूण सध्या सिकंदरा इथल्या रुनकता परिसरात भाड्याच्या घरात होता. तो बूट कारखान्यात काम करत असून त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याला काही दिवसांपासून पत्नीच्या वर्तनावर संशय येत होता. पत्नीचं घर मालकाच्या ओळखीतील टिंकू नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा त्याने आरोप केला आहे. या गोष्टीला पतीने विरोध केल्यावर पत्नी नाराज झाली आणि काही दिवसांपूर्वीच ती घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली.

2 एप्रिलच्या रात्री घडली थरारक घटना

पीडिताने सांगितल्याप्रमाणे, 2 एप्रिलच्या रात्री सुमारे 11 वाजता तो भाजी मंडईजवळून जात असताना अचानक तीन जणांनी त्याची पत्नी, तिचा कथित प्रियकर टिंकू आणि घर मालक या तिघांना अडवलं. सुरुवातीला तिघांनी त्याच्याशी वाद विवाद करून शिवीगाळ केली. त्यानंतर हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं.

या दरम्यान, पत्नीने चाकूने त्याच्या गुप्तांगावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत तो रस्त्यावर कोसळला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला तातडीने एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. त्याठिकाणी शस्त्रक्रिया केल्यानंतर सध्या त्याची प्रकृती बरी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

पोलिसांचा तपास आणि संशय

रुनकता पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सांगितलं की, पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान पीडिताच्या जबाबात वारंवार बदल होत असल्याचं तपासात आढळून आल्याने पोलिसांचा त्याच्यावरही संशय आहे.

शस्त्रक्रियेनंतर चौकशी करताना त्याला स्वतःच्या राहत्या घराचा अचूक पत्ता सांगता आला नाही. जुना पत्ताही चुकीचा दिला असल्याचं यावेळी समोर आलं. त्याचबरोबर हल्लेखोर बाइकवरून आले होते आणि घटनास्थळी पत्नी नव्हती, असंही त्याने एकदा जबाब देताना सांगितलं. त्यामुळे पोलिस आता सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करतायत. जर पीडिताचे आरोप खरे ठरले तर संबंधित तिघांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT