Thane News Saam Tv
क्राईम

Fake Currency Scam : धक्कदायक! पैसे दुप्पट करून देतो सांगायचा, खऱ्या पैशांऐवजी द्यायचा खेळण्यातील नोटा, नेमकं प्रकरण काय?

Thane News : ठाणे शहर पोलिसांनी खेळण्यांच्या नोटा आणि बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एका आरोपीला अटक करून लाखो रुपयांच्या बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

ठाणे पोलिसांनी खेळण्यांच्या नोटांद्वारे फसवणुकीचा कट उघड केला

आरोपी संजय कुमार भारती याला अटक; चार साथीदार फरार

बनावट सोन्याची बिस्किटे आणि ३६० बंडल खेळण्यांच्या नोटा जप्त

फसवणुकीच्या टोळीवर कापूरबावडी पोलिसांची कारवाई

लहान मुलांच्या खेळण्यातील नोटाद्वारे उघडपणे फसवणुकीचा खेळ मांडणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे शहर पोलिसांनी यश आले आहे. याप्रकरणी भिवंडीमधील संजय कुमार पकौडीलाल भारती (४३) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक करत, त्यांच्याकडून खेळण्यातील नोटा व सोन्यासारख्या दिसणाऱ्या ३८ बिस्कीट जप्त केली आहेत. तसेच भारती याच्या चार साथीदारांची नावे पुढे आली आहेत . तसेच भारती याला येत्या ११ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नितेश शेळके यांना एका इसमाने एक लाख रुपये दिल्यास त्या बदल्यात तीन आठवड्यामध्ये तीन लाख रुपये देतो, असे आमिष दाखवले होते. मात्र ते न मिळाल्याने त्याबाबत तक्रारदारांना संशय आल्याने त्यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात धाव घेत, त्याबाबत तक्रार केली. दरम्यान तक्रारदारांना ३ नोव्हेंबर रोजी साकेत बाळकुम रोड येथे त्या इसमाने तो नोटा घेऊन येणार असल्याचे सांगितले.

ही माहिती तक्रारदारांनी पोलिसांना दिल्यानंतर तेथे सापळा रचण्यात आला. त्यामध्ये तक्रारदारांना खऱ्या नोटांच्या बदल्यात खेळण्यातल्या बनावट नोटा देत असताना, संजयकुमार भारती याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याच दरम्यान त्याच्या साथीदारांनी संधीचा फायदा घेऊन तिथून पळ काढला. तर ताब्यात घेतल्यानंतर भारती यांच्या घराची झडती घेतल्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक करण्याचा कट समोर आला. तसेच त्या खेळण्यातील नोटा, सोन्याच्या बिस्किटासारखे बनावट पिवळ्या धातूंची बिस्किटे सापडले.

यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे प्रत्येकी १०० बंडल असलेले एकूण ३६० बंडल सापडले. या पैशांवर फॉर स्कूल प्रोजेक्ट युज ओन्ली असे इंग्रजीत आणि भारतीय बच्चो का बँक असे छापलेले होते. तसेच सोन्यासारखी दिसणारे त्याच्यावर सुईस्से १०० ग्रॅम फाइन गोल्ड ९९९.९ असे इंग्रजीत लिहिलेले एकूण ३८ पिवळ्या धातूंची बिस्किट आणि गुन्ह्यातील दुचाकी हे जप्त केले आहे. ही कारवाई तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT