Crime Saam Digital
क्राईम

Firing in Wedding : नवरदेवाचा लग्नातच गोळीबार, नवरीसह ४ जणांचा मृत्यू; नंतर स्वत:ही जीवन संपवलं

Crime News: नवरदेवाने लग्नाच्याच दिवशी नवरीसह ४ जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली. थायलंडच्या उत्तर पूर्व थाई प्रांतातील नाखोन रत्चासिमा वांग निम खियो जिल्ह्यातील एका गावात शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thailand Crime News:

नवरदेवाने लग्नाच्याच दिवशी नवरीसह ४ जणांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली. थायलंडच्या उत्तर पूर्व थाई प्रांतातील नाखोन रत्चासिमा वांग निम खियो जिल्ह्यातील एका गावात शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

२९ वर्षीय माजी सैनिक चतुरंग सुकसुक हे ४४ वर्षीय कांचना पचुन्थुक नावाच्या महिलेसोबत तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी सकाळी त्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर रिसेप्शनची पार्टी होती. दरम्यान, नवरा चतुरंग सुकसुक पार्टीमधून अचानक निघून गेला आणि परत आला. दोघांमध्ये काही कारणावरुन कारणांवरुन वाद झाला. यानंतर चतुरंग कारकडे गेला आणि बंदूक घेऊन आला', अशी माहिती पोलिसांनी दिली.

आई, बहिण आणि दोन पाहुण्यांवर झाडल्या गोळ्या

रिसेप्शन पार्टीतच नवऱ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात त्याच्या ६२ वर्षीय आणि ३८ वर्षीय बहिणीचा मृत्यू झाला. त्याने तिथे उपस्थित असलेल्या दोन पाहुण्यांवरही गोळ्या झाडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. यानंतर नवरदेवाने स्वतः वर देखील गोळी झाडून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, रिसेप्शन पार्टीमध्ये चतुरंग नशेत होता. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

हत्याकांडाचं धक्कादायक कारण...

एका वृत्तानुसार, नवऱ्याच्या मनात असुरक्षितता होती की, त्याची बायको त्याला सोडून जाईल. यावरुनच त्यांच्यात वाद झाले असल्याची माहिती तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने दिली. चतुरंग हा थाई सैन्यात रेंजर होता. एका युद्धाच्या वेळी, त्याला त्याचा उजवा पाय गमवावा लागला. त्याने स्विमींगमध्ये इंडोनेशिया आणि कंबोडिया येथे २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये दोन रौप्य पदकेही जिंकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT