Asian Games 2023: एशियन गेम्स पदक विजेत्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव! राज्य सरकारकडून बक्षिसांच्या रक्कमेत दहापटीने वाढ

Cash Prize For Asian Games Medal Winner: पदकविजेत्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
avinash sable
avinash sable twitter
Published On

Cash Prize For Asian Games Medal Winner:

राज्याचे नाव उज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक विजेत्या खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, १९ व्या चीन येथे झालेल्या, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस १ कोटी रूपये,मार्गदर्शकास १० लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूसाठी ७५ लाख रूपये,मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार रुपये, कांस्यपदक प्राप्त खेळाडूस ५० लाख रुपये ,मार्गदर्शकास ५ लाख रुपये रोख असे बक्षिस देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. (Latest sports updates)

avinash sable
Viral Cricket Video: बंगळुरूत Live सामन्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, पुढे जे घडलं..पाहा Video

तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्यात येणार असल्याचं राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे.

तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या खेळाडूस ७५ लाख,मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार ,रौप्यपदक विजेत्या खेळाडूस ५० लाख,मार्गदर्शकास ५ लाख तर कास्यपदक विजेत्यास २५ लाख,मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत. अशी माहिती बनसोडे यांनी दिली आहे. (

avinash sable
Viral Video: हजारो प्रेक्षकांमध्ये मावळा गरजला;भारत- बांगलादेश सामन्यातील शिवगर्जनेचा VIDEO पाहून छाती गर्वाने फुगेल

यापुर्वी सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना १० लाख, मार्गदर्शकांना २ लाख ५० हजार, रौप्यपदकासाठी ७.५ लाख,मार्गदर्शकास १ लाख ८७ हजार , कांस्यपदकासाठी ५ लाख,मार्गदर्शक १ लाख २५ हजार रुपये दिले जात होते.

मात्र या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकाचं शतक पूर्ण केलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या खेळडूंनी मोलाचं योगदान दिलं आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असे श्री बनसोडे यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com