Andhra Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime News : रक्षकच भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर बलात्कार, २ पोलिसांचा काळा कारनामा, राज्यात खळबळ

Andhra Pradesh Crime : आंध्र प्रदेशातील संतापजनक घटना! दोन पोलिसांकडून २५ वर्षीय फळ विक्रेत्या तरुणीवर निर्जनस्थळी सामूहिक बलात्कार. आरोपी सुरेशराज व सुंदर यांना अटक करण्यात आली असून निलंबन करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • आंध्र प्रदेशात दोन पोलिसांकडून फळ विक्रेत्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

  • आरोपी पोलिस सुरेशराज आणि सुंदर यांना अटक करण्यात आली असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

  • घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

  • या घटनेने समाजात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आंध्र प्रदेशातील फळ विकणाऱ्या २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कदायक म्हणजे या घटनेते पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी पोलिसांची नाव डी. सुरेशराज आणि पी. सुंदर अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला आणि तिची मुलगी फळ विकण्यासाठी आंध्र प्रदेशहून तिरुवन्नमलई येथे आल्या होत्या. फळ विकून झाल्यानंतर दिवसभराचा क्षीण जावा यासाठी त्या रस्त्याच्या कडेला गाडी लावून थांबल्या होत्या. तसेच त्या कोणाची तरी वाट पाहत होत्या. या दरम्यान एक पोलिसांची गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली.

या गाडीतून डी. सुरेशराज आणि पी. सुंदर हे गाडीतून उतरले. हे दोघेही त्या दोघींच्या अधिकच जवळ जात असल्याने पीडितेने आणि तिच्या आईने आरोपी पोलिसांवर हल्ला केला. यानंतर संतप्त झालेल्या पोलिसांनी त्या दोघींना निर्जनस्थळी नेले. तिथे तरुणीवर या दोन नराधमांनी बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने आणि तिच्या आईने घटनास्थळावरुन पाय काढत पोलीस ठाणे गाठले.

या घटनेप्रकरणी कॉन्स्टेबल डी. सुरेशराज आणि पी. सुंदर या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे. मात्र या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पुन्हा एकदा कायद्याचा रक्षकच भक्षक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता या दोघांना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar Video : "कठोर निर्णयांची वेळ आली!"; नसरापूर प्रकरणावर अभिनेत्री भडकली; थेट सरकारला विनंती, वाचा नेमकं काय म्हणाली?

नसरापुरात 'त्या' दिवशी काय घडलं? नराधमाने चिमुकलीला काय खायला दिलं? पोलीस तपास धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणावरुन एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

ममतांच्या बंगालमध्ये ९२% विक्रमी मतदान, पण मुद्दे मात्र गायब; नेमकं कोणाचं पारडं जड? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

8th Pay Commission: आता पगार थेट ₹18,000 वरून ₹69,000? सरकारचा हा निर्णय ठरवणार कर्मचाऱ्यांचे भविष्य

SCROLL FOR NEXT