Ranjit Kasle Allegations Saam Tv News
क्राईम

Ranjit Kasale : कराडचं एन्काऊंटर ते विधानसभा निवडणुकीत EVMशी छेडछाड; सस्पेंड PSI रणजित कासलेंची A टू Z माहिती

Ranjit Kasle Allegations : रणजित कासले यांनी आज पत्रकारांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. 'ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा झाले होते.

Prashant Patil

पुणे : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रणजित कासलेंची. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले अखेर पुण्यात दाखल झाले आहेत. ते लवकरच आता बीड किंवा पुणे पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी यावेळी खळबळजनक आरोप आणि मोठे गौफ्यस्फोट केले आहेत. बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला मिळाली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी रणजित कासले यांनी केला होता. त्यानंतर ते आज पुण्यात दाखल झाले आहेत.

रणजित कासले यांनी आज पत्रकारांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. 'ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते', असा दावा कासले यांनी केला आहे. त्यांनी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील यावेळी दाखवलं आहे. तसेच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरबाबत देखील त्यांनी मोठा दावा केला आहे.

‘मला एन्काऊंटरबद्दल प्रश्न विचारण्यात आले, माझ्याकडे पुराव्याची मागणी करण्यात आली. एन्काऊंटरचा आदेश असा उघडपणे कोणी देईल का? एन्काऊंटरच्या ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व चर्चा या बंद दाराआड झाल्या, असं रणजित कासले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. 'ज्या दिवशी मतदान होतं, त्या दिवशी माझ्या बँक खात्यात १० लाख रुपये आले. वाल्मिक कराडची जी कंपनी आहे, संत बाळूमामा कंट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्यामध्ये महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीमधून माझ्या खात्यात १० लाख रुपये जमा झाले. त्यातले मी साडेसात लाख रुपये परत केले. जे उरलेले अडीच लाख रुपये आहेत त्यातून माझा खर्च सुरू आहे. ईव्हीएमपासून तुम्ही दूर राहायचं, यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते'. असं रणजित कासले यांनी म्हटलं आहे. 'मी पुणे पोलिसांच्या सतत संर्पकात आहे, मी पोलिसांना शरण जाणार आहे', अशी माहितीही यावेळी कासले यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT