सोलापूर : काही दिवसांपूर्वी सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. डॉ. वळसंगकर यांनी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप आहे. मात्र, न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात महत्त्वाचा सीडीआर जोडलेला नाही. त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून अॅड. प्रशांत नवगिरे यांनी ही बाब निदर्शनास आणली आहे.
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. फिर्यादीत नमूद आहे की, डॉ. वळसंगकर यांनी मनीषा मुसळे माने यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. पण, त्यांना मनीषाशिवाय आणखी कोणाचा त्रास होता का? आत्महत्येच्या आदल्या दिवशी डॉक्टरांना कोणाचे फोन आले होते? त्यांनी कोणाला फोन केले होते? या प्रश्नांची उत्तरे 'सीडीआर'मधून मिळण्याची शक्यता होती. पोलिसांनी न्यायालयात ७२० पानांचे दोषारोपपत्र दाखल केलं आहे.
अॅड. प्रशांत नवगिरे यांनी सांगितले की, या दोषारोपपत्रात 'सीडीआर' जोडलेला नाही. कौटुंबिक कलहाची चर्चा होती, पण दोषारोपपत्रात त्याबद्दल काहीही माहिती नाही. दोषारोपत्रातील ३५० पाने बँकेच्या स्टेटमेंटची आहेत. एफआयआरमध्ये नोंद आहे की, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी एसपी न्युरोसायन्स रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांनी मनीषा मुसळे यांना दोन वेळा कोर्टात हजर केले. त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.