Badlapur Crime : बदलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाइंड योगेश राऊतसह ४ जणांना जन्मठेप

Badlapur Crime News : बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांची हत्या करणाऱ्या आरोपींना जन्मठेपाची शिक्षा मिळाली आहे. तब्बल ११ वर्षांनी शिक्षा मिळाली आहे.
Badlapur News
Badlapur Saam tv
Published On

माजी नगरसेवक मोहन राऊत हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. माजी नगरसेवक मोहन राऊत हत्याकांडातील सर्व आरोपी आता तुरुंगात खडी फोडणार आहेत. या प्रकरणाचा खटला ११ वर्ष विशेष मोक्का न्यायालयात सुरु होता. या हत्याकांडातील आरोपींना जन्मठेपाची शिक्षा मिळाल्यानंतर राऊत कुटुंबीयांनी भावना व्यक्त केल्या आहे. 'अखेर आम्हाला न्याय मिळाल्याची भावना राऊत कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Badlapur News
Hindavi Patil : ढसाढसा रडली, व्हिडिओतून सगळं दु:ख सांगितलं; डान्सर हिंदवी पाटील नेमकं काय झालं?

बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना ठाणे येथील विशेष मोक्का न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ठाणे कोर्टाच्या निकालानंतर आम्हाला अखेर न्याय मिळाल्याची भावना राऊत कुटुंबीयांनी व्यक्त केली. बदलापुरातील माजी नगरसेवक आणि तत्कालीन शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत यांची 23 मे 2014 रोजी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Badlapur News
Maharashtra Politics : दाऊदच्या मध्यस्थीने सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे उपशहरप्रमुख योगेश राऊत याने रचल्याचं समोर आलं होतं. अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत होतं. याप्रकरणी योगेश राऊतसह सात जणांवर मोक्का लावण्यात आला होता.

Badlapur News
Gopichand Padalkar : 'धर्मांतरासाठी आलं तर ठोकून काढा, सैराट करणाऱ्यास 11 लाख'; ऋतुजा प्रकरणावर गोपीचंद पडळकर आक्रमक

११ वर्ष या प्रकरणाची विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज ठाणे कोर्टानं या प्रकरणातल्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. या निकालानंतर राऊत कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलंय. आमच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया मोहन राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांनी दिलीय.

Badlapur News
Gopichand Padalkar : 'धर्मांतरासाठी आलं तर ठोकून काढा, सैराट करणाऱ्यास 11 लाख'; ऋतुजा प्रकरणावर गोपीचंद पडळकर आक्रमक

माजी नगरसेवक मोहन राऊत हत्या प्रकरणातील आरोपींचे नाव देखील हाती आले आहेत. या प्रकरणातील चंद्रकांत म्हसकर, गंगाराम लिंगे, योगेश राऊत, अजय गुरव यांना जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. तसेच जन्मठेपेसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com