Solapur Crime Saamtv
क्राईम

Solapur Crime: नाशिक पोलिसांची पुन्हा सोलापूरात धाड, ड्रग्ज कारखाना उध्वस्त; कोट्यवधींचा माल जप्त

Solapur News: नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये धाड टाकली असून ड्रॅग्ज कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी

Solapur Crime News:

ससून रुग्णालयातून ललित पाटीलने पलायन गेल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करीचे प्रकार समोर येत आहेत. ललित पाटीलचे कनेक्शन असलेल्या नाशिक, मुंबईमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला होता. तसेच सोलापूरमध्येही ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर आता पुन्हा एकदा नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये धाड टाकली असून ड्रॅग्ज कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे.

ललित पाटील (Lalit Patil Case) प्रकरणानंतर राज्यात ड्रॅग्जचा सुळसुळाट सुरू झाला आहे. नाशिक शहर पोलिसांनी पुन्हा एकदा सोलापूरमध्ये जाऊन मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. नाशिक (Nashik) येथील सामनगाव ड्रॅग्ज प्रकरणाचे पाळेमुळे शोधत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ येथील नाशिकच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने हा कारखाना उध्वस्त केला. तर या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून नऊ किलो ६९० ग्रॅम एमडी आणि किलो 500 ग्रॅम एमडी सदृश्य अमली पदार्थ जप्त केले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठ दिवसांपूर्वी सोलापूर औद्योगिक वसाहतीत (Solapur MIDC) धाड टाकून एमडी (मॅफेड्रॉन) (MD) तयार हाेणाऱ्या कारखाना सील केला हाेता. आता पुन्हा त्याच परिसरात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज प्रकरणात आणखी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

Kalyan Dombivli: उंबरडे डंपिंग ग्राउंडच्या सुपरवायझरला भाजप आमदाराच्या समर्थकाकडून मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर

Konkan Beaches : ऑक्टोबरच्या कडक उन्हात थंडगार समुद्रकिनाऱ्याची सफर! पाहा कोकणच्या कुशीत लपलेले 'हे' ७ सुंदर किनारे

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

SCROLL FOR NEXT