Lalit Patil case: नाशिकमधून मुंबई पोलिसांनी जप्त केलं २० किलो एमडी; ललित पाटीलनं गिरणा नदीत फेकलं होतं ड्रग्ज

Mumbai Police seizes 20 kg narcotics : ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघ याने नाशिकच्या गिरणा नदीत ड्रग्ज फेकलं होत.
Lalit Patil case: नाशिकमधून मुंबई पोलिसांनी जप्त केलं २० किलो एमडी; ललित पाटीलनं गिरणा नदीत फेकलं होतं ड्रग्ज
Published On

Lalit Patil case:

मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये परत छापेमारी करत २० किलोग्रॅमचं एमडी जप्त केलं आहे. पोलिसांनी सरस्वतीवाडी येथून करण्यात आल ड्रग्स जप्त केलंय. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघ याने नाशिकच्या गिरणा नदीत ड्रग्ज फेकलं होत. त्यानुसार मुंबई पोलीस तिथे शोधमोहीम राबवत आहेत. (Latest News)

साकीनाका पोलिसांच्या पथकाकडून ही कारवाई केली जात आहे. या शोध मोहिमेत पोलिसाच्या पथकाने ड्रग्जचे पॅकेट जप्त केली आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत ४० कोटी आहे. ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघने देवळा तालुक्यातील गिरणा नदीत ड्रग्ज फेकलं होतं. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

दरम्यान अंधेरी न्यायालयाने ड्रग्ज माफिया ललित पाटीलची पोलीस कोठडी २७ ऑक्टोबरपर्यंत वाढवलीय. ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्यानंतर मागील आठवड्यात चेन्नई येथून ललितला अटक करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २०२० मध्ये मेफेड्रोन ड्रग्जचा रॅकेट उद्धवस्त केलं होतं. त्या रॅकेटमध्ये सुद्धा ललित पाटीलचा हात होता.

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेवरून सत्ताधारी शिवसेना आणि ठाकरे गट शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं युद्ध सुरू झालंय. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारने माफियांना मदत केल्याचा आरोप शिंदे गटातील नेत्यांनी केला होता. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी आरोप केला होता की, उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना सरकारी वकिलांनी ललित पाटीलला रुग्णालयात राहण्यास विरोध केला नव्हता. तसेच ललित पाटीलला उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख केले होते, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान ललित पाटील याला जेव्हा अटक करण्यात आली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर आरोप करता म्हणाले होते की, ललित पाटील सापडला आहे, राज्यातील ड्रग्ज प्रकरणात एक मोठं रॅकेट समोर येणार, अनेक गौप्यस्फोट होणार असं म्हटलं होतं.

नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन

ललित पाटीलचा ड्रग्ज बनवण्याचा कारखाना होता. नाशिकच्या शिंदे गावात त्याचा हा कारखाना होता. यात एमडीचं उत्पादन २०२१ पासून केलं जात होतं. र महिन्याला या ठिकाणाहून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती. या एमडीचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये केला जात होता. ललित पाटीलचा कारखाना त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत होता. ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने ते एमडीचा पुरवठा करत होते. यातून ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील दर महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा नफा कमावत होते.

Lalit Patil case: नाशिकमधून मुंबई पोलिसांनी जप्त केलं २० किलो एमडी; ललित पाटीलनं गिरणा नदीत फेकलं होतं ड्रग्ज
Dada Bhuse News: सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ; ललित पाटील प्रकरणावरून दादा भुसेंकडून नोटीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com