Akluj Horse Market: पांढरा शुभ्र रंग, चमकदार डोळे अन् ऐटीत चाल... २ वर्षाच्या प्रिन्सची किंमत तब्बल ३० लाख

Akluj Horse Market 2023: पांढरा शुभ्र, चमकदार डोळे, ऐटीत चालणारा... असा देखणा पंजाबी जातीचा प्रिन्स घोडे बाजाराचे आकर्षण ठरला आहे.
Akluj Horse Market
Akluj Horse MarketSaamtv
Published On

Akluj Horse Market:

राज्यातील प्रमुख घोडेबाजारांपैकी म्हणून अकलूजच्या घोडेबाजाराची ओळख आहे. या घोडेबाजारास प्रारंभ झाला असून यंदा या घोडे बाजाराचे १४ वे वर्ष आहे. यंदा पंजाबी, मारवाडी तसेच देशभरातील जातिवंत घोड्यांनी बाजार चांगलाच बहरला आहे. मात्र या सगळ्यात आकर्षण ठरतोय तो पंबाजचा प्रिन्स घोडा. दिसायला पांढराशुभ्र उंच अन् देखणा असलेल्या या घोड्याला तब्बल ३० लाखांची बोली लागली आहे.

कार्तिकी यात्रा आणि दिवाळीच्या निमित्ताने अकलूजच्या (Akluj) कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दरवर्षी घोडे बाजार भरतो. यंदा बाजारात उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाना, बिहार, गुजरात या राज्यातून मारवाडी, काटेवाडी, पंजाबी असे नामवंत जातीचे सुमारे एक हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

एक लाखापासून ते 30 लाख रूपये किंमतीचे घोडे बाजारात दाखल झाले आहेत. हा घोडे बाजार सुमारे दोन महिने चालतो. या काळात सुमारे पाच कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल होते. यंदा उत्तर प्रदेशातून आलेला पंजाब जातीचा प्रिन्स घोडा बाजाराचे मुख्य आकर्षण ठरला आहे. या घोड्याला तब्बल 30 लाख रूपयांची बोली लागली.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akluj Horse Market
Maharashtra Kesari 2023: कुस्त्यांचा थरार रंगणार! 'महाराष्ट्र केसरी'ची तारीख ठरली; महिंद्रा थार, ट्रॅक्टरसह बक्षिसांची लयलूट

रंगाने पांढरा शुभ्र, चमकदार डोळे, उभे कान ऐटीत चालणारा... रूंद पाठ असा देखणा पंजाबी जातीचा प्रिन्स अकलूजच्या घोडे बाजारात सर्वांचेच लक्ष वेधत आहे. अवघ्या दोन वर्षांच्या प्रीन्सची उंची सहा फूट असून तो तीन देव मनाचा आहे. त्याच्या गळ्यावर तीन देव मन (लहान भोवरे) असणे भाग्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळे या घोड्याला मोठी मागणी आहे.

प्रिन्सला दररोज पाच लिटर दूध आणि चार किलो चना दाळ असा खुराक दिला जातो. घरात समृद्धी नांदावी आणि वैभव वाढावे यासाठी हौशी लोक याची खरेदी करतात. त्यामुळे अशा घोड्यांना बाजारात मोठी मागणी होते असते. पहिल्याच दिवशी प्रिन्स घोड्याला 30 लाखांची मागणी झाल्याचे बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

Akluj Horse Market
Kunbi certificate: मराठवाड्यापाठोपाठ राज्यभरात कुणबींच्या नोंदी शोधा; मुख्यमंत्री शिंदेंचे अधिकाऱ्यांना आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com