'त्यांचे घोडे त्यांचा बाजार...'संजय राऊतांनी साधला भाजपवर निशाणा

जे काय करायचे ते करा, शेवटी विजय आमचा आहे', असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv
Published On

मुंबई : राज्यसभेची निवणूक होणार हे अटळ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी आज महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) वर्षा निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक झाल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.'त्यांचे घोडे त्यांचा बाजार आम्हाला बाजारात बोलायची गरज नाही. जे काय करायचे ते करा, शेवटी विजय आमचा आहे', असे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बैठकी संपल्यावर केलं आहे. ( Maharashtra Politics Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. महाविकास आघाडीने राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर माध्यामांशी संवाद साधताना राऊत म्हणाले,'आम्ही निवडणूक स्वीकारली आहे. आमचं बळ दाखवण्याची आम्हाला पुन्हा एकदा संधी आहे. आम्हाला बळ दाखवायचं नव्हतं. पण विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली आहे. आता विरोधकांना पश्चाताप होणार आहे. महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडणून येतील. कोणीही शहाणपणा करू नये. अजिबात घोडेबाजार होणार नाही. केंद्रीय यंत्रणा आमच्यावर दबाव टाकत आहे, पण आम्हीच जिंकणार आहे'.

संजय राऊत पुढे म्हणाले, संजय पवार पहिल्या फेरीत निवडून येतील. पूर्ण बहुमत आमच्याकडे आहे. त्यांचे घोडे त्यांचा बाजार आम्हाला बाजारात बोलायची बोलायची गरज आहे. जे काय करायचे ते करा, शेवटी विजय आमचा आहे, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला .

Sanjay Raut
दोन्ही ठाकरेंनी तमाशा बंद करावा; खासदार सुजय विखेंचा हल्लाबोल

बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली ?

महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यसभेच्या संख्याबळाच्या गणितावर प्राथमिक चर्चा झाली. मतांची जुळवणी करण्यासाठी तज्ञ कमिटी ठरवत पक्षांना मतदान कसे करायचे हे सांगणार आहे. तसेच घटक पक्षांबाबतही बैठकतही चर्चा झाली. मतं फुटणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे यावरही विशेष चर्चा झाली. संख्या बेरजेचे गणित जुळले की पक्षांनी व्हीप काढत आपल्या पक्षातील आमदारांची काळजी घ्यायची हे ठरले आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com