Sindhudurg Kudal taluka Young man Saam Tv News
क्राईम

Sindhudurg Crime News : आधी अपहरण केलं, नंतर नग्न करुन मारहाण करत हत्या; सिंधुदुर्गमधील दोन वर्षापूर्वीचं हत्याकांड समोर

Kudal Taluka Youth Naked and Murder : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याचे दोन वर्षापूर्वी अपहरणानंतर मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Prashant Patil

विनायक वंजारे, साम टीव्ही

सिंधुदुर्ग : 'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती बीडपेक्षा गंभीर आहे. कुडाळमधील अंकुश बिडवलकर नावाच्या तरुणाला फक्त २२ हजार रुपये द्यायचे होते, म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याचा' आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. संबंधित तरुणाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ वैभव नाईक यांनी फेसबुक पेजवरून शेअर केला आहे. हत्या करणारा आरोपी हा शिंदे गटाचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार वाचवण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी पोलिसांना फोन करून दबाव टाकला असल्याचा, आरोपही वैभव नाईक यांनी केला आहे. आरोपींचा शिंदे गटातील तो आका कोण? याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी देखील नाईक यांनी केलीय.

नेमकं प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याचे दोन वर्षापूर्वी अपहरणानंतर मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मार्च २०२३ मधील असून आता उघडकीस आली आहे. सिद्धिविनायक बिडवलकर याला चेंदवण गावातील नाईकनगर येथून अपहरण करून कुडाळमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याचा मृतदेह सातार्डा-सावंतवाडी येथील स्मशानभूमीत नेऊन तिथे तो जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची पोलीस तपासात पुढे आली आहे.

नातेवाईकांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकाशला मार्च २०२३ मध्ये पैशांच्या कारणावरुन सिद्धेश अशोक शिरसाट, अमोल श्रीरंग शिरसाट, गणेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर केरकर यांनी त्याला राहत्या घरातून जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले होते. त्या दिवसापासून प्रकाश बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा सर्व प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने बेपत्ता प्रकाशचा संशयितांनी घातपात केला असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीकोनातून आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रकाश बिडवलकर याची नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण हिच्या तक्रारीवरुन ९ एप्रिल २०२३ रोजी प्रकाश बिडवलकर याचं अपहरण झाल्याचा गुन्हा निवती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झाला आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाटसह ३ संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT