
पुणे : कौटुंबिक वादातून राकेश खेडेकरने त्याची पत्नी गौरी खेडेकरची हत्या केली. दोघे काही महिन्यांपासून बेंगळुरुत भाड्याने राहत होते. २६ मार्चच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. त्याच वादातून राकेशने गौरीची चाकूने भोसकून हत्या केली. पत्नीचा मृतदेह घरात एका बॅगेत भरुन राकेशने ती सूटकेस बाथरुममध्ये ठेवली. त्यानंतर तो कारने पुण्याला येण्यास निघाला. पण साताऱ्यात त्याला महाराष्ट्र पोलिसांनी अटक करण्यात आली. पत्नीला संपवल्यानंतर राकेशने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
बेंगळुरु पोलिसांना गौरीचा मृतदेह राकेश आणि गौरी राहत असलेल्या बेंगळुरुच्या फ्लॅटमध्ये सापडला. ही हत्या पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर व्यक्त केला. राकेशने गौरीला सूटकेसमध्ये कोंबलं, त्यावेळी ती जिवंत होती, अशी महत्त्वाची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दिली आहे. गौरीला सूटकेसमध्ये ठेवण्यात आलं, त्यावेळी तिचा जीव गेलेला नव्हता. गौरीला सूटकेसमध्ये टाकल्यावर राकेशने ती बॅग ओढली. त्यावेळी बॅगचं हँडल तुटलं. त्यामुळे राकेशने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना गुंडाळली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हँडल तुटल्याने सुटकेस खेचून नेण्यात अडचण येत असल्याने राकेशने सूटकेस हॉलमधून बाथरुममध्ये नेली. गौरीच्या शरीराला झालेल्या जखमांमधून रक्तस्राव सुरु होता. रक्त वाहून जावे यासाठी राकेशने सुटकेस पाईपजवळ नेऊन ठेवली, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. आपण मानसिकदृष्ट्या व्यथित असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न राकेशने केला. पण आम्हाला त्याच्याबद्दल वेगळाच संशय आहे. त्याची मानसिक स्थिती उत्तम आहे. आपली मानसिक स्थिती अस्थिर असल्याचं भासवून तो सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तो पोलिसांची दिशाभूल करत आहे. त्यानं गौरीची हत्या करण्यासाठीच तिला बंगळुरुत आणले असावे, असा संशय पोलिसांनी बोलून दाखवला. टाईम्स ऑफ इंडियाने याबद्दलचं वृत्त दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.