Woman death mystery saam tv
क्राईम

Crime News: 16 व्या मजल्यावरून तरूणी पडली; रक्ताच्या थारोळ्यात पडला निर्वस्त्र मृतदेह, कुटुंबियांकडून हत्येचा आरोप

Woman death mystery: गाजियाबादच्या इंदिरापुरममध्ये 16व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे ती कपड्यांशिवाय आढळली. पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास सुरू असून कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे

Surabhi Jayashree Jagdish

गाजियाबादच्या इंद्रापुरम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. १६ व्या मजल्यावरून खाली पडून एक तरूणाचा मृत्यू झाला आहे. बिल्डींगमधून खाली पडून या तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ पसरलीये. मुख्य म्हणजे ज्यावेळी ही मुलगी उंचावरून खाली पडली तेव्हा तिच्या शरीरातवर कपडे नव्हते.

समोर आलेल्या माहितीनुसार, जयपुरिया सनराइज ग्रीन सोसायटीच्या 16व्या मजल्यावरून ही तरुणी खाली पडली. इतक्या उंचावरून खाली पडताच तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सोसायटी परिसरात एकच गोंधळ उडाला.

कोण होती ही तरूणी?

मृत तरुणी ही सोसायटीमध्ये कपडे प्रेस करण्याचं काम करणाऱ्या महिलेची मुलगी होती. ती तिच्या आईसोबत याच सोसायटीत राहत होती. तिची आई रोज घराघरात जाऊन कपडे इस्त्री करून त्याच्या घराचा गाडा हाकत होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण होती आणि तिच्या आईच्या मेहनतीवर त्यांचा संसार चालत होता.

ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी काही नागरिक जमा झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, त्या वेळी तिच्या अंगावर कपडे नव्हते. त्यामुळे आणखी खळबळ उडाली. या दृश्यामुळे उपस्थित लोक हादरले आणि काही जणांनी आरडाओरडा सुरू केला.

पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने कळवण्यात आलं. पोलिसांची टीम लगेच घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तरुणीचं कुटुंबीयही त्याठिकाणी पोहोचलं. यावेळी कुटुंबाने सोसायटी प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर निष्काळजीपणाचा आरोप केला. उंच मजल्यांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

इंदिरापुरमचे एसीपी अभिषेक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेकडे पोलीस गांभीर्याने पाहत आहेत. सोसायटीतील आणि आसपासच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जातेय. या फुटेजमधून तरुणी एकटी होती की तिच्यासोबत आणखी कोणी होतं का याची माहिती घेतली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहरातील ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या निशाण्यावर

Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा 337 किमीपर्यंत विस्तार होणार; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला भविष्यातील मास्टर प्लॅन

Parbhani Accident : झरी-जिंतूर मार्गावर हिट अँड रन; भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू

Shocking : संतपाजनक! खाऊ देण्याच्या बहाण्यानं नराधमानं डाव साधला; अत्याचार करून ७ वर्षीय मुलाची हत्या

Ashok Kharat: भोंदू बाबाला मदत करणारे कोण? खरात प्रकरणात SITचा तपास कुठंपर्यंत आला? IPS सातपुतेंनी दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT