Uttar Pradesh Crime  Saam Tv
क्राईम

Crime: तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या दोघांना तरुणीच्या कुटुंबीयांनी एका खोलीत नको त्या अवस्थेत पकडले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.

Priya More

Summary -

  • उत्तर प्रदेशमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना

  • गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची फावड्याने वार करत हत्या

  • मृतदेह नदीकाठी पुरल्याचा प्रकार उघड

  • पोलिसांनी २४ तासांत प्रकरणाचा उलगडा केला

उत्तर प्रदेशमध्ये 'सैराट'सारखी भयंकर घटना घडली. तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत कुटुंबीयांनी पकडलं. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी दोघांची फावड्याने हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह नदीच्या काठावर खड्डा खोदून पुरले. दोघेही बेपत्ता असल्याचा त्यांनी बनाव रचला पण अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या भावाला अटक केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील पाकबारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरी सबजीपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या तरुणीचे समोरच्या घरात राहणाऱ्या तरुणासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हा तरुण दुसऱ्या धर्माचा होता. हा तरुण गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मध्यरात्री तिच्या घरी आला होता. अचानक तरुणीच्या कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी खोलीचे दार उघडले तर दोघेही नको त्या अवस्थेत पकडले गेले. तरुण-तरुणी दोघेही प्रचंड घाबरले. त्यांना या अवस्थेत पाहून कुटुंबीयांना राग अनावर झाला.

तरुण-तरुणी दोघांनीही त्यांची माफी मागितली पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. तरुणाने पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. पण तरुणीच्या कुटुंबीयांनी रागाच्या भरात दोघांना बेदम मारहाण करत एका खोलीमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर फावडा आणून आधी तरुणाची हत्या केली. बॉयफ्रेंडची डोळ्यासमोर हत्या झाल्याचे पाहून तरुणी चक्कर येऊन पडली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्याच फावड्याने तिची देखील निर्घृण हत्या केली. 'तू आमचे नाक कापले. आता काहीच उरलं नाही. तुला देखील जगण्याचा अधिकार नाही.', असे म्हणत त्यांनी मुलीचा देखील जीव घेतला.

दोघांची हत्या केल्यानंतर त्यांनी दोन्ही मृतदेह घरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या गगन नदीच्या काठावर खड्डा खोदून त्यामध्ये पुरले. मुलगा घरी आला नाही त्यामुळे मुलाचे कुटुंबीय चिंतेत आले आणि त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस या तरुणाचा शोध घेत होते अशातच त्याची हत्या झाल्याचे समोर आले. २४ तासांतच हे हत्याकांडाचे प्रकरण बाहेर आले. तरुणाच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या ३ भावांसह कुटुंबातील ७ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishal Nikam Wedding : "चंद्रभागेसारखे प्रेम आपले सखी..."; मराठमोळ्या अभिनेत्याने उत्तराखंडमध्ये घेतले सातफेरे, शाही विवाह सोहळ्याची झलक पाहा-VIDEO

Accident : ५ मित्र देवदर्शनाला निघाले, पण वाटेतच काळाचा घाला, परभणीत मध्यरात्री भयंकर अपघात

Chhatrapati Shivaji Maharaj Favourite Food: छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! आठव्या वेतन आयोगात मिळणार ९ लाखांपर्यंत एरियर; वाचा सविस्तर

Health Care : तुम्हाला रात्री फळे खायची सवय आहे? मग 'ही' फळे खाणे लगेच टाळा

SCROLL FOR NEXT