Telangana Crime Saam Tv
क्राईम

Crime: १७ वर्षीय मुलाकडून ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेल; १ पीडिता गरोदर

Telangana Crime: तेलंगणामध्ये भयंकर घटना घडली. ३ अल्पवयीन मुलींवर १७ वर्षांच्या मुलाने बलात्कार केला. व्हिडीओ तयार करून आरोपीने या मुलींना ब्लॅकमेल केले. गरोदर राहिलेल्या एका मुलीचा बळजबरीने गर्भपात करण्यात आला.

Priya More

Summary:

  • तेलंगणामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार

  • व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक

  • गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आला

  • पोलिसांनी आरोपी आणि डॉक्टरांना केली अटक

तेलंगणामधून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. १७ वर्षीय मुलाने ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. यामधील एक मुलगी गरोदर राहिली. या मुलीला त्याने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी इंटरमिजिएटचा विद्यार्थी आहे.

पोलिसांनी आरोपीच्या २२ वर्षीय मित्राला देखील अटक केली. आरोपी तरुणाने त्याच्या मित्राच्या घरी एका मुलीवर बलात्कार केला होता. गर्भवती मुलीवर बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या आरोपाखाली एका खासगी रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका नर्सला देखील अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे तेलंगणामध्ये खळबळ उडाली आहे.

आरोपीने मुलाने पीडितांना प्रेमाचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्यावर अनेक वेळा बलात्कार केले. त्याने या मुलींवर बलात्कार करतानाचे व्हिडीओ शूट करून त्याद्वारे तो मुलांना ब्लॅकमेल करत होता. या मुलींवर पैसे देण्यासाठी आरोपी दबाव टाकत होता. पैसे दिले नाही तर तुमचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल आणि कुटुंबातील सदस्यांना पाठवेल अशी धमकी तो देत होता.

पोलिसांनी सांगितले की, २०२५ मध्ये आरोपी मुलाने या अल्पवयीन मुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण आता उघड झाले जेव्हा एका पीडित मुलीला हे अत्याचार सहन न झाल्याने तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला मारहाण केली त्याच्याकडचा मोबाइल जप्त केला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. तसंच पोलिसांनी गरोदर राहिलेल्या मुलीचा गर्भपात करणाऱ्या २ डॉक्टर आणि नर्स यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT