Nagpur Crime  Saam Tv News
क्राईम

Nagpur Crime: नागपूर हादरले! भरचौकात गोळीबार अन् चॉपरने हल्ला; तरुणाला संपवलं, हत्याकांडाचा थरारक VIDEO

Nagpur Man Shot and Stabbed in Broad Daylight: नागपूरमध्ये गोळ्या झाडून आणि चॉपरने हल्ला करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये भरचौकात गोळीबार आणि चॉपरने हल्ला करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. क्षुल्लक वादातून तरुणाला जिवानिशी संपवलं. नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही भयानक घटना आहे. या हत्याकांडाचा थराराक व्हिडिओ समोर आला असून व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गु्न्हा दाखल केला असून तिघांना अटक केली. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी प्रकाश नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. भाजी बाजारात रात्री चौघांनी शिवीगाळ करत गोळीबार केला आणि चॉपरने तरुणावर हल्ला केला. या गोळीबार आणि हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. सोहेल खान असे मृतकाचे नाव असून प्रकाश नगर येथील गोविंद लॉनजवळ ही घटना घडली.

नागपूरमध्ये घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नागपुरातील या हत्याकांडाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक जण बंदूक घेऊन आजू बाजूच्या लोकांना धाक दाखवत आहे. तर दुसरे दोघे जण सोहेल खान हा तरुण मेलेला असताना सुद्धा चॉपरने वार करत आहे. या घटनेमुळे नागपूरच्या गोधनी प्रकाश नगर परिसरात दहशतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. याठिकाणी पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम, आणि भूषण या ३ आरोपींना अटक केली. तर चौथा आरोपी चंदू डोंगरे फरार आहे. दरम्यान घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. काही तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मेयो रुग्णालयासमोर देखील लोक जमले आणि तेथे देखील तणाव निर्माण झाला होता. भाजीचा ठेला लावण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT