Bhiwandi Crime Saam Tv
क्राईम

Crime: भयंकर! शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर दगडाने ठेचून हत्या; भिवंडी हादरले

Bhiwandi Crime: भिवंडीमध्ये एका ६५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शेतामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे भिवंडी हादरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Priya More

फैय्याज शेख, भिवंडी

भिवंडीमध्ये शेतावर कामासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे भिवंडीमध्ये खळबळ उडाली. भिवंडी तालुक्यातील चावेभरे गावात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील चावेभरे या गावांमध्ये शेतावर गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर दगडाने ठेचून या महिलेची हत्या करण्यात आली. चावेभरे गावामध्ये राहणारी ही महिला दुपारच्या सुमारास शेतामध्ये कामं करण्यासाठी गेली होती पण ती परत आलीच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी घटनेची माहिती स्थानिक गणेशपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचाच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्यामध्ये असलेले ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच होते. दागिने चोरीला गेले नसल्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली गेली नसल्याचे समोर आले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले. गणेशपुरी पोलिसांनी याप्रकरणी सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

हत्येच्या घटनेनंतर त्या परिसरातून ३ जण पळून जाताना काही जणांनी पाहिले. ही माहिती हत्या झालेल्या वृद्ध महिलेच्या मुलाने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अत्याचारानंतर महिलेने याची माहिती कुणाला देऊ नये यासाठी तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

Tilak Verma: टीम इंडियाच्या टी २० वर्ल्डकप मिशनला जबरा धक्का; भारत-न्यूझीलंड मालिकेतील ३ सामन्यांमधून धुरंधर तिलक वर्मा बाहेर

बिनविरोधनंतर आता बिनशर्तचा धडाका, ऐन निवडणुकीत ठाकरेंचा उमेदवार शिंदेसेनेत

SCROLL FOR NEXT