Nallasopara Crime Google
क्राईम

Nallasopara Crime : बाप आहे की हैवान... पोटच्या ३ मुलीवर आळीपाळीने बलात्कार, कोकणातून आई मुंबईत आली, पण...

Crime News: नालासोपाऱ्यातील भयावह घटनेत एका पित्यानेच आपल्या तिन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. मुलींनी नालासोपारा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक गुन्हा उघडकीस आला.

Dhanshri Shintre

नालासोपाऱ्यात एक हृदयद्रावक घटना घडली असून, एका पित्यानेच आपल्या तिन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. विशेष म्हणजे, आरोपी आधीच खंडणी, गोळीबार आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मुलींचे जबाब नोंदवून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नालासोपाऱ्यात उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेत सख्ख्या बहिणींवर त्यांच्या जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला एकूण 5 मुली आहेत. पीडित मुली मूळच्या कोकणातील असून, आरोपी 56 वर्षीय पिता हा कुख्यात गुन्हेगार आहे. कोकणात असताना तो सातत्याने मुलींवर अत्याचार करत होता. या अत्याचारातून एका मुलीचा तब्बल ४ वेळा गर्भपात करण्यात आला होता. अखेर आईने मुलींना सोबत घेत नालासोपाऱ्यात नातेवाईकांकडे आश्रय घेतला.

मात्र, मुलींनी हिम्मत करून पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नालासोपाऱ्यात एका भयावह घटनेने शहर हादरले आहे. तीन सख्ख्या बहिणींनी स्वतःच्या पित्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. मोठी मुलगी २१ वर्षांची असून, उर्वरित दोन अल्पवयीन आहेत. वडिलांकडून सातत्याने होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून त्यांनी हिम्मत दाखवत पोलिसांकडे धाव घेतली.

मोठ्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, खंडणी आणि गोळीबारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नात्याला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे शहरभर संतापाचे वातावरण पसरले असून, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT