saamtv
क्राईम

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Missing Woman Home Guard Found Dead : बीडमध्ये एका धक्कादायक गुन्ह्याने शहर हादरून गेले आहे. २७ वर्षीय महिला होमगार्ड अयोध्या व्हरकटे हिची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीड शहरात धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता तक्रारीनंतर एका होमगार्ड महिलेचा मृतदेह गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी आढळला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. यानंतर बीडमधील गुंडाराज कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मृत महिलेचे नाव आयोध्या राहुल व्हरकटे (वय 27, रा. बीड) असे आहे. आयोध्या ही होमगार्ड म्हणून कार्यरत होती. ती काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. आज सकाळी बीड तालुक्यातील पांगरी गावाच्या पुढे एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणात शिवाजी नगर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी सुरू केली. चौकशीतून वृंदावनी खरसाडे (वय 35, रा. गिरामनगर, बीड) हिने आयोध्या व्हरकटेचा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. प्राथमिक माहितीनुसार मृत व आरोपी महिला या दोघीही एकाच गावच्या रहिवासी असून, सध्या बीड शहरातील गिरामनगर भागात वास्तव्यास होत्या.

या खुनामागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, दोन महिलांमधील पूर्वीपासूनचे काही वैयक्तिक वाद असल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, आरोपी वृंदावनी खरसाडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीतून खुनाचे खरे कारण उघड होण्याची शक्यता आहे. या घटनेने बीड शहरात भीतीचे व वातावरण निर्माण झाले असून, होमगार्ड दलातही मोठी खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT