Nanded Minor Girl Molested by Superintendent Saam tv
क्राईम

Crime News: 'तू मला खूप आवडते, आय लव्ह यू...', अंगाला वाईटपद्धतीने स्पर्श, आश्रमशाळेच्या अधीक्षकाचे विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य

Minor Girl Molested by Superintendent in Nanded: नांदेडमधील एका आश्रम शाळेमध्ये वसतिगृह अधीक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

Priya More

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्ररकरणी वसतिगृह अधीक्षकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला 'आय लव्ह यू, माझ्यासोबत चल' असे म्हणत विनयभंग केला. तसंच मुलीच्या अंगाला वाईट पद्धतीने स्पर्श केला. याप्रकरणी आरोपीविरोधात कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गु्न्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. पण पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या बिलोली तालुक्यातील एका आश्रम शाळेत ही घटना घडली. चाळीस वर्षीय वसतिगृह अधीक्षक गजानन राजरवाडने शाळेतीलच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात पकडून 'तू मला खूप आवडतेस, आय लव्ह यू, तू माझ्यासोबत चल, आपण कारमध्ये बसू.' असे म्हणत मुलीचा विनयभंग केला.

तसेच अल्पवयीन मुलगी ही तिच्या खोलीमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत झोपलेली असताना वसतिगृह अधीक्षकाने तिच्या अंगाला वाईट पद्धतीने स्पर्श केला. याप्रकरणी आरोपी गजानन राजरवाडविरोधात कुंडलवाडी पोलिस ठाण्यात पोस्को आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

बिलोलीच्या कुंडलवाडी गावात दौलापूर रस्त्यावर संत गोरोबा प्राथमिक आश्रमशाळा आहे. याच शाळेत गजानन राजूरवाड हे अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर पीडित मुलगी ही आश्रम शाळेत सातवी वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपीने ९ एप्रिल आणि ११ एप्रिलला शाळेच्या परिसरात आणि आश्रम शाळेतील रूममध्ये जाऊन मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलगी प्रचंड घाबरली.

अधीक्षकाने केलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी १८ एप्रिल रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गजानन राजरवाडविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Live Update: नांदगावला धुवाधार पाऊस लेंडी नदीला पुर .रेल्वे अंडरपास 3 फूट पाण्याखाली

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT