Nanded Crime News Saam tv
क्राईम

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Nanded Crime News: नांदेडमधील एका शिवसेना नेता स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत असल्याचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय. पोलिसांनी छापा टाकून या बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश केला, ज्यामुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

  • नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याचा स्पा सेंटरच्या आड कुंटणखाना चालवण्याचा प्रकार उघड

  • पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली; महत्त्वाचे पुरावे हस्तगत

  • आरोपीवर गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

नांदेड शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्याचा धक्कादायक कारमाना समोर आलाय. 'स्पा सेंटर'च्या नावाखाली चक्क कुंटणखाना चालवत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हा सर्व प्रकार उघकीस आलाय. स्पा सेंटरच्या नावाखाली येथे अश्लील प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय पोलिसांना होता. या संशयाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार,शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा नांदेड दक्षिण युवासेना जिल्हाध्यक्ष अमोद साबळे हा पदाधिकारी स्पा सेंटरचा मालक होता. स्पा सेंटरच्या नावाखाली शिवसनेचा पदाधिकारी कुंटणखाना चालवायचा, अशी माहिती समोर आल्याने जिल्ह्यातील खळबळ उडालीय.

भाग्यनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. स्पा सेंटरमध्ये काम करणाऱ्या नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड यांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केलीय. तर स्पा सेंटरचा मालक अमोदसिंग साबळे, मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे फरार आहेत. पोलिसांनी स्पा सेंटरमधून चार महिलांची सुटका देखील केली. याशिवाय पोलिसांनी १६ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

याबाबत भाग्यनगर पोलिसांनी दोन आरोपीचा शोध सुरू केलाय. महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत केल्या प्रकरणी, पोउपनि नरेश केशव वाडीवाले यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर गुरनं ४४५/२०२५ कलम ३,४,५ (१), (ड) अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळावर ३० कोटींचे कोकेन जप्त, DRI ची मोठी कारवाई

Shocking: ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरले, नंतर...

Crime: बॉयफ्रेंडच्या मदतीने आईने घेतला पोटच्या मुलाचा जीव, हातपाय बांधून अमानुष मारहाण, नंतर...

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT