Nashik Naresh Karda  saam Tv
क्राईम

Nashik Naresh Karda: बिल्डर नरेश कारडा यांच्या अडचणीत वाढ; फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल

Nashik Naresh Karda : नरेश कारडा यांनी एका व्यक्तीची ४ कोटी रुपयांची फसवणूक केलीय.

Bharat Jadhav

Nashik Naresh Karda :

कारडा कन्स्ट्रक्शनचे बिल्डर नरेश कारडा यांच्या अडचणीत वाढ झालीय. कारडा यांच्याविरोधात जेलरोड परिसरातील एका प्लॉटच्या व्यवहारापोटी ४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उपनगर पोलिसात दाखल झाला आहे. कराडा सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.(Latest News)

सुनील देवकर (रा. बळीराम पेठ, जळगाव) यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिलीय. यानुसार त्यांचे आजोबा गजानन देवकर (९०) यांचा आणि नरेश कारडा यांच्यात २००७ पासून व्यावसायिक संबंथ आहेत. या संबंधातून त्यांनी २०१७ मध्ये कारडा यांच्या मालकीचा जेलरोडच्या पंचक शिवारातील प्लॉटचा दोघांमध्ये व्यवहार झाला होता. त्या व्यवहारापोटी देवकर यांच्या आजोबांनी ४ कोटी रुपये दिले होते. तर कारडा यांनी त्या मिळकतीचे खरेदीखत करण्यासाठी वेळ मागून घेतला.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यादरम्यान कारडा यांनी २०१९ मध्ये या प्लॉटची परस्पर विक्री करीत देवकर यांच्या आजोबांची फसवणूक केली. कारडा यांनी देवकर यांना दुसरी मिळकत न देता त्यांच्या चार कोटी रुपयांची फसवणूक केली. वेळोवेळी पैशांची मागणी करूनही कारडा यांनी पैसे दिले नाहीत. अखेर सुनील देवकर यांनी उपनगर पोलिसात तक्रार दिली.

दरम्यान ज्या गुंतवणूकदारांची कारडा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून फसवणूक झाली असेल त्यांनी गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयातील शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. बहुतेक ग्राहकांनी फ्लॅट किंवा गाळ्यासाठी कारडा कन्स्ट्रक्शनकडे खरेदीसाठी गुंतवणूक केली आहे. त्यातील बहुतांशी रक्कम ही रोख स्वरुपात दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT