Nashik Crime : नाशिकमध्ये गुंतवणूकदारांची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक; बिल्डर नरेश कारडा यांना अटक

Nashik Crime : कारडा कन्स्ट्रक्शनचे बिल्डर नरेश कारडा यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक झालीय.
Nashik Crime
Nashik Crimesaam Tv
Published On

(तरजेब शेख)

Karda Construction Naresh karda builder:

नाशिक जिल्ह्यातील नामांकित कारडा कन्स्ट्रक्शनचे बिल्डर नरेश कारडा यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरुवात न केल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्याविरुद्धात मुंबई नाका पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल केला होता. नाशिक शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक केली. प्रसिद्ध बिल्डर कारडा यांना अटक झाल्याने नाशिकच्या बिल्डर क्षेत्रात खळबळ माजलीय. (Latest News)

अटक केल्यानंतर कारडा यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. मुंबई नाका पोलिसात राहुल लुणावत (रा. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लुणावत यांच्या फिर्यादीनुसार, नरेश कारडा यांची कारडा कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम फर्म आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारडा कन्स्ट्रकशनच्या माध्यमातून अशोका मार्ग या परिसरात नरेश कारडा यांनी २०१९ मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू केला होता. या बांधकाम प्रकल्पातील दोन गाळ्यांसाठी लुणावत आणि त्यांचा मित्र सतीश कोठारी यांना दोन गाळे कारडा देणार होते. त्यासाठी कारडा यांनी तक्रारदारांकडून १ कोटी २० लाख रुपये घेतले होते.

बुकिंग रक्कम घेऊनही बांधकाम प्रकल्पाला सुरूवात होत नसल्याने तक्रारदारांनी कारडा यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र कारडांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतरतक्रारदारांनी या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेतली. ज्या जागी बांधकाम प्रकल्प होणार होता त्या ठिकाणी कोणताच प्रकल्प अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी कारडा यांच्या पैशांसाठी तगादा लावला.

परंतु कारडा यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करत बांधकाम व्यावसायिक व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांना अटक करण्यात आली. नरेश कारडा यांनी आणखी काही गुंतवणूकदारांची जवळपास ४० ते ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. पोलीस कोठडीत याप्रकरणी तपासात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

Nashik Crime
Navi Mumbai Crime: धक्कादायक! जन्मदात्या आईचा गळा आवळून खून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com