Pune Accident Saam Tv News
क्राईम

Pune Accident : नियंत्रण सुटलं, डंपर थेट घरात शिरला; ऐनवेळी चालकाने स्टेरिंग फिरवली अन्...

Shirur : पुण्यातील शिरूर तालुक्यात अष्टविनायक महामार्गावर करड्याजवळ पहाटे डंपर घरात घुसल्याची घटना घडली. प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली असून चालक जखमी झाला आहे. ग्रामस्थांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Alisha Khedekar

  • अष्टविनायक महामार्गावर डंपर घरात घुसल्याने भीषण अपघात

  • घरातील कोणालाही दुखापत झाली नाही; फक्त शौचालयाचे मोठे नुकसान

  • अपघातानंतर चालक जखमी अवस्थेत पळण्याचा प्रयत्न करत होता

  • नागरिकांच्या मदतीने चालक पकडून पोलिसांकडे सुपूर्द

पुण्यातील शिरूर येथे मोठी दुर्घटना टळली. अष्टविनायक महामार्गावर करड्या गावाजवळील देशमुख वस्ती येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट रस्त्यालगतच्या एका घरात घुसला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळलेल्या माहितीनुसार, पुण्यातील अष्टविनायक महामार्गावर करड्या जवळील देशमुख वस्तीत शनिवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने डंपर जात होता. या डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा डंपर थेट शेजारील वस्तीच्या एका घरात घुसला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत घर वाचवले अन शौचालयावर डंपर वळवला.

चालकाच्या प्रसंगावधतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु डंपर शौचालयाकडे वळवल्याने शौचालयाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अपघातानंतर डंपर शेतात जाऊन थांबला. डंपर चालक अपघातात जखमी झाला असून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातामुळे नागरिकांची परिसरात मोठी धावपळ सुरु होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. तसेच चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: ग्लोइंग स्कीन हवीये? मग दररोज चेहऱ्यावर करा दुधाने मसाज

Pune Crime: पुण्यात चाललंय काय! व्यवसायिक दांपत्याला टोळक्याकडून लाठ्या काठ्याने मारहाण|Video Viral

कुंभक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण; पोलिसांनी आवळल्या गावगुंडांच्या मुसक्या

Phone Cover: फोन कव्हर वापरल्याने कोणते नुकसान होतात?

Maharashtra Live News Update: पवई विभागात प्रेम प्रकरणात मुलाने राहत्या घरात आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT