ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक जण साखरऐवजी गुळ किंवा मधाचे सेवन करतात. परंतु, दोघांपैकी कोणती गोष्ट आरोग्यासाठी फायदेशीर आहे, जाणून घ्या.
गुळ हे पारंपरिक पदार्थांमध्ये जास्त वापरले जाते. गुळामध्ये उष्णता असते, जे शरीराला आतून उबदार ठेवण्यात आणि उर्जा प्रदान करण्यास मदत करते.
मधमाश्यांनी तयार केलेला मध हा नैसर्गिक अमृतापेक्षा कमी नाही, कारण यामध्ये औषधी गुणधर्म असतात.
आयरन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमने समृद्ध असलेला गूळ रक्त वाढवण्यास आणि थकवा दूर करण्यास मदत करतो.
मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स असतात जे शरीराला डिटॉक्स करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
हिवाळ्यात गूळ शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो, म्हणून लोक झोपण्यापूर्वी ते दुधासोबत गुळ खातात. उन्हाळ्यात, मध शरीराला थंडावा देते आणि घसा खवखवणे, खोकला आणि थकवा यापासून आराम देते.
दोन्ही पदार्थ गोड असल्याने जास्त प्रमाणात खाणे हानिकारक ठरु शकते. जर तुम्हाला आहारात आयरन आणि मेटबॉलिजम वाढवायचे असेल तर गूळ खा. परंतु जर तुम्हाला नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहारात हवा असेल कर मधाचे सेवन करा.