ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महागडे फेशियल आणि ब्युटी प्रोडक्टशिवाय देखील तुम्ही ग्लोइंग आणि चमकदार त्वचा मिळवू शकता. यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा.
१ चमचा दूध आणि अर्धा चमचा हळद मिक्स करुन पेस्ट तयार करा आणि १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
चेहरा स्वच्छ धुवून काकडीचा रस लावून १५ मिनिटांसाठी ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
मध त्वचेला मॉइश्चरायइज्ड करते तर लिंबू नैसर्गिक ब्लीचिंगचे काम करते. ही पेस्ट आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरा.
नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. झोपण्यापूर्वी हलक्या हाताने नारळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.
स्ट्रॉबेरी आणि योगर्ट मिक्स करुन मास्क तयार करा. १० ते १५ मिनिटासांठी चेहऱ्यावर लावून मास्क धुवा. यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग होते.
दररोज झोपण्यापूर्वी १० मिनिटांसाठी कोरफडीचे जेल चेहऱ्यावर लावा नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.