ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अंग आहे. हृदय आपल्या शरीरात रक्त पंप करुन शरीरातील इतर भागांना रक्तपुरवठा करण्याचे कार्य करते. यासाठी हृदयाला निरोगी ठेवणे गरजेचे आहे.
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयाशी संबधित आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, जाणून घ्या.
तुमच्या दररोजच्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, कडधान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
दररोज कमीत कमी ३० मिनिटे चाला. तसेच ३० ते ४० मिनिटे योगा किंवा तुमचा आवडता कोणताही व्यायाम करा.
तंबाकू आणि मद्यपानचे सेवन टाळा. तंबाकू आणि मद्यापानचे सेवन केल्याने हृदयाच्या धमन्या आकुंचन पावतात ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
ताणतणावामुळे ब्लड प्रेशर वाढतो म्हणून संगीत ऐका किंवा मेडिटेशन करा. यामुळे ताण कमी होतो.
दररोज ७ ते ८ तासांची चांगली झोप घ्या. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.