

निवडणूक आयोगानं SIR 2.0 चा दुसरा टप्पा सुरू केलाय.
जवळपास ५१ कोटी मतदारांची माहिती तपासली केली जाणार
मतदार ओळखपत्र, आधार आणि रहिवासी पुरावा आवश्यक आहेत.
मतदार यादीमधील घोळ, मतचोरीच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं अॅक्शन मोडवर आले आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी SIRचा दुसरा टप्प्याची घोषणा केली आहे. मतदार यादी पुनरिक्षण मोहीमेचा हा दुसरा टप्प्यात जवळपास ५१ कोटी मतदारांची नावे, पत्ता आणि इतर तपशील तपासला जाणार आहे.
या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, गोवा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप राज्याचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या मते, SIR ची सुरुवात ४ नोव्हेंबरपासून होईल आणि ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही मोहिम पूर्ण केली जाईल. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे. यादरम्यान अनेक टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रिटिंग आणि प्रशिक्षण दिलं जाणार. तर ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ पर्यंत घरोघरी जावून मोजणी केली जाणार आहे. यादरम्यान ९ डिसेंबर २०२५ ला ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केली जाईल. ९ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ पर्यंत दावे आणि आक्षेप घेण्याची प्रक्रिया केली जाईल. ९ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सुनावणी आणि पडताळणी केली जाईल.
या मोहिमेदरम्यान या मोहिमेत राजकीय पक्षांचे ५.३३ लाख बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आणि ७.६४ लाख बूथ एजंट (बीएलए) सहभागी होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. या यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी आणि चुका दुरुस्त करण्यासाठी बीएलओ प्रत्येक घराला किमान तीन वेळा भेट देतील. ते घरोघरी जाऊन Form-6 आणि Declaration Form एकत्रित करतील, जमा करतील. तर नवीन मतदारांना फॉर्म भरण्यासाठी मदत करतील. त्यानंतर हा फॉर्म ERO Electoral Registration Officer किंवा AERO (Assistant Electoral Registration Officer) कडे देतील सोपवतील.
निवडणूक आयोगाने तीन फॉर्म जारी केले आहेत. यात फॉर्म ६ मध्ये नवीन मतदार आपले नाव जोडू शकतील. फॉर्म ७ भरून मतदार आपले नाव हटवू शकतील. ज्या मतदारांचे नाव आधीपासून मतदार यादीत नाव आहे, ते दुसऱ्यांदा आलेले आपले नाव काढू शकतील. मतदारांना जर त्यांच्या मतदान कार्डमधील काही बदल करण्यासाठी किंवा कोणतीही चूक दुरुस्त करण्याची असेल तर फॉर्म ८ भरावा लागेल.
केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले पेन्शन पेमेंट ऑर्डर
सरकार किंवा स्थानिक संस्था, बँक, पोस्ट ऑफिस, एलआयसी यांनी जारी केलेले प्रमाणपत्र
जन्म दाखला
पासपोर्ट
शैक्षणिक प्रमाणपत्र
कायमचा रहिवासी दाखला
वन हक्क प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
एनआरसी
राज्य किंवा स्थानिक संस्थेने तयार केलेले कुटुंब नोंदणी
जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.