Shreya Maskar
सागरगड किल्ला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात आहे. सागरगड किल्ला हा गिरिदुर्ग आहे.
सागरगड किल्ला अलिबाग आणि धरमतरच्या खाडीच्या किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. सागरगड किल्ला घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.
सागरगड किल्ल्यावर जाण्यासाठी खंडाळे गावातून एक पायवाट सुरू होते. ही पायवाट अलिबाग-पेण रस्त्यावरील खंडाळे गावातून जाते.
सागरगड किल्ल्याच्या पायवाटेवर एक छोटेसे मंदिर आहे. मंदिरात गणपतीची मूर्ती, महिषासुरमर्दिनी देवीची मूर्ती आणि शिवलिंग आहे.
सागरगड किल्ल्याजवळ 'दोढाणे' धबधबा आहे. पावसाळ्यात याचे सुंदर दृश्य पाहून मनाला भुरळ पडते.
सागरगड किल्ल्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन पेण आहे. पेणहून अलिबागला जाण्यासाठी खाजगी वाहन किंवा बसने प्रवास करता येतो.
सागरगड किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे. त्यामुळे येथे मित्रांसोबत आवर्जून जा. हिवाळ्यात येथे सुंदर वातावरण अनुभवता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.