Shreya Maskar
पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे पुरंदर किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता. पुरंदर किल्ला हे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.
पुरंदरचा तह पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग यांच्यात झाला.
पुरंदर किल्ल्याला हे नाव पुरंदर गावावरून पडले, जे किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. या गावाचे मूळ नाव 'पूर' होते आणि काळाच्या ओघात ते 'पुरंदर' बनले.
मिर्झाराजे जयसिंग यांच्या नेतृत्वाखालील मोगल सैन्याने दिलेरखानाच्या मदतीने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता.
अगदी साधा-सोपा ट्रेक करायचा असेल तर पुरंदर किल्ल्यावर नक्की जा. येथून पुण्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
तुम्ही पुरंदर किल्ल्यावर छान फोटोशूट देखील करू शकता. येथून मावळाऱ्या सूर्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.