Satara Firing:  Saam Digital
क्राईम

Satara Firing: साताऱ्यातील वाई एमआयडीसीमध्ये गोळीबार, एकजण जखमी

Satara Firing: साताऱ्यात गोळीबारीची घटना घडली असून यात एकजण जखमी झालाय. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

Bharat Jadhav

साताऱ्यातील वाई एमआयडीसीमध्ये गँगवॉरमधून गोळीबार झाल्याची घटना घडलीय. या गोळीबारात एकजण जखमी झालाय. रिव्हॉलवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार,गँगवॉरमधून गोळीबार झाल्याची घटना वाई एमआयडीसी घडलीय. या गोळीबारात एका जण जखमी झालाय. त्याच्या हाताला गोळी लागली असून त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. अमर सय्यद असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान वाई, भुईंज, आणि एलसीबी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान हा गोळीबार कोणी केला आणि कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाहीये.

गोळीबार करणाऱ्या गुंडांची धिंड

पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकाने अटक केलीय. या टोळीने ज्या ज्या परिसरात हवेत गोळीबार केला त्या तळेगावातील परिसरातून गुंडांची पोलिसांनी धिंड काढलीय.

तीन पिस्तुले आणि सात जिवंत काडतुसे टोळीकडून जप्त करण्यात आलीत. २० जून रोजी या टोळीने रात्री साडेआठच्या सुमारास गजानन महाराज चौक राजेंद्र चौक या दरम्यान हवेत चार-पाच गोळ्या झाडल्या होत्या. अखेर या टोळीला जेरबंद करण्यात गुंडविरोधी पथकाला यश आलं आहे. रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे, नीरज उर्फ दादया बाबू पवार आणि आदित्य नितीन भोईनल्लू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT