Satara Crime  Saam Tv
क्राईम

Satara Crime: ५०० रुपयांचे आमिष दाखवून सोबत नेलं, १२ वर्षीय मुलीवर बलात्कार; सातारा हादरले

Satara Police: साताऱ्यामध्ये एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. ५०० रुपयांचे आमिष दाखवून या मुलीला आरोपी घेऊन गेले. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली.

Priya More

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यामध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोर आली आहे. ५०० रुपयांचे आमिष दाखवत या मुलीला आरोपी घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी बलात्कार केला. लालासो यशवंत पवार (वय ५५ वर्षे) आणि विकास जाधव उर्फ इब्र्या (वय २५ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेतला असून या दोन्ही आरोपींची नावे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचे समुपदेशन केले जात आहे.

या प्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी आरोपींविरोधात कलम ७५,७६,७८,६४,६४ (२),६५ (१), ३५ (२), ४, ६, ८, १० आणि १२ अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली असून लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT