Miraj 3 day old baby stolen from government hospital Saam Tv News
क्राईम

Sangli News : माझ्या बायकोशी गोड बोलून जवळीक साधली; सांगलीत ३ दिवसांचं बाळ चोरीला, आजोबांनी सांगितली कहाणी

Sangli 3 Day Old Baby Stolen : बाळ चोरीच्या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Prashant Patil

विजय पाटील, साम टिव्ही

सांगली : सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून ३ दिवसांचं बाळ चोरीला गेलं आहे. शासकीय रुग्णालयातल्या प्रसूती विभागातून नुकताच जन्मलेल्या ३ दिवसांच्या बाळाची चोरी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कविता आलदार या महिलेची १ तारखेला म्हणजेच दोन दिवसांपूर्वीच प्रसूती झाली होती. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ तारखेला दुपाराच्या सुमारास बाळ जागेवर आढळून न आल्यानं एकच खळबळ उडाली. बाळ चोरीच्या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बाळाच्या आजोबांनी सांगितली कहाणी

'मुलीची इथे १ तारखेला दुपारी तीन वाजता प्रसूती झाली. मग तिथून आमच्या मुलीला दुसरीकडे ॲडमिट केलं. काही वेळेनंतर एक मुलगी तिथे आली. ती माझ्या बायकोला म्हणाली की, माझी चुलत बहिणीची देखील इथेच प्रसूती झालीय, आणि बाळ आहे काचेच्या पेटीत. तिने माझ्या बायकोच्या मागे फिरुन फिरुन माया लावली. आमच्या पोरीलाही वाटलं की, आमच्या आईसोबत ही मुलगी फिरतेय तर ओळखीची असेल. आम्ही जेवायला गेलो, तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो, आपल्या पोरीसारखी आहे ती, तुला मदत करेन, तिला पण जेवायला बोलव. '

'आम्ही तिला विचारलं की, जेवायला येते का? तेव्हा ती म्हणाली नाही, माझं जेवण झालंय. आम्ही गेल्यानंतर ती आमच्या मुलीजवळ गेली आणि सांगितलं की, बाळाला १६ नंबरमध्ये लस टोचून आणते. मुलीला वाटलं आईसोबत ही मुलगी फिरतेय तर परत आणेल. मी आल्यानंतर यांना विचारतो तर यांनी सांगितलं १६ नंबर गेलेत. त्यानंतर मी पळत आलो आणि तिथे पाहिलं तर कुणी नाही, मग इथे सर्व खळबळ उडाली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT