Sagli Crime News : क्षुल्लक कारणामुळे नवऱ्याने बायकोचा गळा चिरून खून केल्याची घटना सांगलीत उघड झाली आहे. येथील सरकारी घाटावर नवऱ्याने बायकोचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. प्रियांका चव्हाण असे मयत महिलेचे नाव आहे. बायकोचा खून केल्यानंतर नवरा फरार झाला आहे. हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला. (Husband Murders Wife Over Minor Dispute at sarkari Ghat in Sangli)
प्रियांका जाकाप्पा चव्हाण रा. सांगलीवाडी असे मयत महिलेचे नाव आहे. तर जाकाप्पा सोमनाथ चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे. संशयित पती हा घटनेपूर्वी बबळेश्वर काकटगी कर्नाटक येथे रहात होता तर पत्नी प्रियांका ही सांगलीवाडी येथे आपल्या आईकडे रहात होती. ती सांगलीतील एका साडी दुकानात काम करत होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये क्षुल्लक कारणामुळे खटके उडत होते.
रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पती जाकाप्पा चव्हाण आणि पत्नी प्रियांका हे सरकारी घाटावर बोलत बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या नवऱ्याने सोबत आणलेला चाकू काढून पत्नी प्रियांका हिचा गळा चिरला. या घटनेनंतर हल्लेखोर पतीने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मयत प्रियांका ही सांगलीतील एका साडी दुकानात कामाला होती तर पती कर्नाटक येथे त्याच्या गावी रहात होता. घरगुती कारणातून हा पतीने पत्नीचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी पोलिसानी धाव घेतली. घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी नवऱ्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.