Sangamner Crime News Saam TV
क्राईम

Sangamner Crime News : शुल्लक कारणावरून वाद, दोन मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या; संगमनेरमधील थरारक घटना

Crime News : सदर व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावर बिअरच्या तीन बाटल्या, काडिपेटी, चप्पल यासह झटापट झाल्याच्या खूणा दिसून येत होत्या.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Sangamner News :

रागाच्याभरात व्यक्ती कधी काय करेल याचा काहीच नेम नसतो. कोणत्याही नात्यात गैरसमज असल्यास ते नातं आणखी बिघडत जातं आणि त्याचा वाईट शेवट होतो. याचीच प्रचिती संगमनेरमध्ये आली आहे. येथे दोन मित्रांनी आपल्या एका मित्राची निर्घृण हत्या केलीये.

शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी आपल्याच मित्राला दारु पाजून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. संगमनेर-लोणी रस्त्यापासून सुमारे तीस फूट आतील मैदानात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या दोन तासांतच दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे. अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेने संगमनेर (Sangamner) तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी समनापूर शिवारातील एका हॉटेल जवळील मोकळ्या पटांगणात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

सदर व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावर बिअरच्या तीन बाटल्या, काडिपेटी, चप्पल यासह झटापट झाल्याच्या खूणा दिसून येत होत्या. मृतदेहापासून काही अंतरावरच मयताचा गळा चिरण्यासाठी वापरलेला चाकूही आढळून आला.

घटनास्थळावर सापडलेल्या बिअरच्या बाटल्या कोठून आणल्या याचा तपास करुन पोलिसांनी अवघ्या तासाभरातच आरोपींची ओळख पटवली. मात्र अटक होण्याच्या भीतीने दोन्ही संशयीत रात्रीपासूनच पसार झाले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आणि पुढील दोन तासातच दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

हत्या करणारे दोन्ही आरोपी आणि मयत एकाच समाजाचे आणि नेहमीसोबत राहणारे होते. शुक्रवारी (22 मार्च ) रात्री त्यांनी वडगाव पान जवळील एका बिअर शॉपीमधून तीन बिअरच्या बाटल्या घेतल्या. तिघांनीही समनापूर शिवारातील एका हॉटेल जवळील मोकळ्या पटांगणात बसून त्या रिकाम्या केल्या.

त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले आणि त्यातून एकाने जवळील चाकू काढून अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत ( वय 22, रा. समनापूर ) याचा धारदार चाकूने गळा चिरुन खून केला. घटनेनंतर दोघेही आरोपी तेथून पसार झाले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेमागे नाजूक कारण असण्याची शक्यता आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून हत्येच्या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

SCROLL FOR NEXT