Crime News Saam Tv
क्राईम

Sambhajinagar Crime: लग्नाचं आमिष दाखवून २ परिचारिकांचं अपहरण; एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Nurse Kidnapped Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाचं आमिष दाखवून दोन परिचारिकांचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kidnapping In Luring Of Marriage

लग्नाचे आमिष दाखवून अपहरण झाल्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Waluj Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

छत्रपती संभाजीनगरमधल्या (Sambhajinagar Crime) वाळुज एमआयडीसीमध्ये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दोन परिचारिका काम करत होत्या. त्याच हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या दोन तरूणांनी त्याचं अपहरण केलं आहे, अशी तक्रार या मुलींच्या नातेवाईकांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार

या दोघी बहिणी (Nurse) 1 फेब्रुवारी रोजी सकाळी रुग्णालयात कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना काळजी वाटू लागली. काळजीपोटी त्यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना त्या दोघीही कामासाठी आल्याच नाही, असं समजलं. त्यानंतर नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान रुग्णालयात काम करणारे इरफान व मुसा हे दोघे सुद्धा गायब असल्याचं त्यांना समजलं. त्यामुळे या दोघांनी त्यांचं अपहरण केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला (Kidnapping In Sambhajinagar) आहे. याप्रकरणी त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहे. अपहरण केलेल्या तरूणींचा शोधही घेतला जात आहे.

लग्नाचं आमिष दाखवून अपहरण

अपहरण झालेल्या दोन्ही परिचारीका मावस बहिणी आहेत. यातील एक मुलगी अल्पवयीन (Kidnapping In Luring Of Marriage) आहे. या प्रेमीयुगुलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. इरफान व मुसा या दोघांनी त्यांच अपहरण केल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे.

इरफान व मुसा या दोघांनी अपहरण केलेल्या परिचारिकांना पळवून जाऊन लग्न करण्याचं (crime news) आमिष दाखवलं. या दोघी बहिणी त्यांच्या आमिषाला बळी पडल्या. त्यांनी या तरूणांसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला, असं त्यांच्या नातेवाईकांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT