Crime News : 35 मजुरांचे अपहरण, माजी आमदार, शिवसेना, भाजपच्या माजी नगरसेवकांसह बड्या नेत्यांवर गुन्हा

Nandurbar Crime News : मजुरांच्या अपहरण प्रकरणान नंदुरबारचे राजकीय वातावरण चांगेलच तापले. याप्रकरणी पोलीसांनी देखील कठोर भूमिका घेतली आहे. शहरात देखील या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.
nandurbar city police charged former bjp corporator along with 9
nandurbar city police charged former bjp corporator along with 9 saam tv

- सागर निकवाडे

Nandurbar News :

नंदुरबार येथे भारतीय अन्न महामंडळाच्या हमाली ठेक्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. याच वादातून याठिकाणी असलेल्या तब्बल 35 मजुरांचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरमी राजकीय नेत्यांसह आठ ते दहा जणांवर नंदुरबार शहर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

दरम्यान 35 मजुरांचे अपहरण झाल्याची बाब पाेलिसांपर्यंत पाेहचली. त्यानंतर नंदुरबार आणि धुळे पोलीसांनी रात्रीतुन बॅरेकेटींग करुन नाकाबंदी केली. तसेच संबंधीतांचा पाठलाग करत मजुरांची माेठा वाहनातून सुटका केली. त्यानंतर सर्वांना वाहनासह नंदुरबार पोलीस ठाण्यात नेले.

nandurbar city police charged former bjp corporator along with 9
Maratha Reservation : ओबीसी आरक्षणास किंचितही धक्का लागणार नाही, सरकारची भूमिका स्पष्ट : उदय सामंत

याप्रकरणी भाजपाच्या एका माजी नगरसेवकासह, वाहन चालक तसेच आठ ते दहा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे याच वादातून तालुका पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हात भाजपाचे माजी आमदार, बडे नेते शिवसेना भाजपाच्या माजी नगरसेवकांसह बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nandurbar city police charged former bjp corporator along with 9
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरु करा : उद्धव ठाकरे गटाची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com