Sambhajinagar News Saam Tv
क्राईम

Shocking News: छत्रपती संभाजीनगरमधील अकॅडमीतील तरुणीच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर; पोलिसांकडून ५ जणांविरोधात गुन्हा

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे

Girl End Life Due To Humiliation Defamation Torture

छत्रपती संभाजीनगरमधील एका अकॅडमीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा (Girl End Life) संपवल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी घडली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर परिसरात ही घटना उघडकीस आली होती. लिना श्रीराम पाटील, असं मृत तरुणीचं नाव आहे. तिने असं टोकाचं पाऊल का उचललं, याचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे.(Latest Crime News)

शासकीय नोकरी मिळविण्याचं स्वप्न उराशी बाळगून लीनाने या अकॅडमीत (Garudzep Academy) प्रवेश घेतला होता. परंतु अकॅडमीत आल्यानंतर तिच्याशी भयंकर घडलं. या तरुणीला अपमानास्पद वागणूक मिळाली. लीना पाटीलचा छळ केला जात होता, या छळाला (Humiliation Defamation Torture) कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचललं. तिने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी घडली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मानसिक छळ आणि अपमानास्पद वागणूक

या प्रकरणी मयत तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून या अकॅडमीच्या संचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Girl End Life At Sambhajinagar) आहे. या अकॅडमीचे संचालक प्रा. नीलेश सोनवणे आणि कर्मचारी तिच्याशी अपमानास्पद वागत होते.

लिनाला खानावळीचे पैसे भरण्यास उशीर झाल्यावर साधा नाश्ताही दिला जात नव्हता. तिला इतर प्रशिक्षणार्थीसमोर अपमानास्पद वागणूक मिळत (Shocking News) होती. 'तू काळी आहेस...., असंही हिणवले जात होती. या सगळ्या प्रकारामुळे लीना तणावात होती. मानसिक छळ आणि मैत्रिणींसमोर अपमान या गोष्टींनी लीना नैराश्यात गेली, अन् शेवटी तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

बाथमरूममध्ये लिनाचा मृतदेह आढळला

मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वसतीगृहाच्या बाथमरूममध्ये लिनाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने लीनाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला (crime news) आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. लिना श्रीराम पाटील मूळ सावखेडा (ता. पाचोड, जि. जळगाव) गावची रहिवासी होती. ती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात आली होती. अपमान, मानहानी अन् छळामुळं तिचं हे स्वप्न अधुरंच राहिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT