Pune Crime: पुणे ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंडचा मोठा खुलासा; 2 महिन्यात सांस्कृतिक शहर हादरलं असतं

Pune Narcotics Mastermind: पुणे ड्रग्ज प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातील मास्टरमाईंडचा मोठा खुलासा झाला आहे.
Pune Nacrotics
Pune NacroticsYandex
Published On

Pune Narcotics Case Mastermind

पुणे (Pune) शहरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा होत आहे. या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणाचे देशभरात कनेक्शन असल्याचं समोर येत आहे. पुणे पोलीस देशभरातील विविध शहरांमध्ये छापेमारी करत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तेव्हापासून या ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाईंड कोण हा सर्वांसमोर यक्ष प्रश्न होता. (Latest Crime News)

पुणे पोलीस या २००० किलो ड्रग्ज रॅकेटच्या मास्टरमाईंडचा शोध घेत (Narcotics Case) होते. यामध्ये "सॅम ब्राऊन" या परदेशी व्यक्तीचं नाव समोर आलं होतं. पुणे पोलीस त्याचा शोध घेत होते. पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणाच्या मास्टरमाईंड संदर्भात मोठा खुलासा झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मास्टरमाईंडने एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिला

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना ३ महिन्यात २००० किलो एमडी बनवण्याचं टार्गेट दिलं असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात युवराज भुजबळ नावाच्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी डोंबिवलीमधून अटक केली ( Narcotics Case Mastermind) आहे.

मास्टरमाईंडने (Pune Narcotics) युवराज भुजबळला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिला होता अशी माहिती मिळतेय. भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळने (Yuvraj Bhujbal) कुरकुंभ येथे एमडीचा कारखाना सुरू केला होता.

Pune Nacrotics
Pune Crime News: संशयाचं भूत मानगुटीवर, चारित्र्यावरील संशयातून पतीचं पत्नीसोबत भयानक कृत्य, पुण्यातील घटना

ड्रग्जचा शोध सुरू

पुणे पोलीसांची तब्बल दहा पथके देशातील विविध शहरांमध्ये सध्या एनसीबीला सोबत घेऊन कारवाई करत आहेत. देशातील दिल्ली, बेंगलोर हैदराबाद या प्रमुख शहरासह पुणे पोलिसांचे पथक अनेक गोडाऊनमध्ये ड्रग्जचा शोध घेत (Pune Crime) आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० फेब्रुवारी रोजी दिल्लीतून तब्बल १८०० कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं.

विकी माने, हैदर शेख, अनिल साबळे, अजय करोसिया आणि युवराज भुजबळ या पाच जणांना पुणे पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. ड्रग्ज तयार करणाऱ्या एका इंजिनिअरला ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येत आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणाचं 'सांगली' कनेक्शन देखील समोर आलं आहे.

Pune Nacrotics
Pune Crime News: पुण्यातील ड्रग्ज विक्रीचे 'दिल्ली' कनेक्शन; पोलिसांच्या छापेमारीत ४००० कोटींचे अमली पदार्थ जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com