Pune Crime News: संशयाचं भूत मानगुटीवर, चारित्र्यावरील संशयातून पतीचं पत्नीसोबत भयानक कृत्य, पुण्यातील घटना

Pune Husband Wife Crime News: चारित्र्यावरील संशयातून पतीने पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोणीकंद परिसरात घडली.
Pune Lonikand Police Station
Pune Lonikand Police StationSaam TV
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

Pune Latest Crime News

चारित्र्यावरील संशयातून पतीने पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोणीकंद परिसरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Lonikand Police Station
Accident News: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने उडवलं; ८ जणांचा जागीच मृत्यू, ७ गंभीर जखमी

हनुमंत अंकुश गिरी अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर साक्षी (वय २३) असं तक्रारदार महिलेचं नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साक्षी आणि हनुमंत यांचा ५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाइकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, हनुमंत याने साक्षीच्या चारित्र्याचा संशय घेतला.(Latest Marathi News)

यातूनच त्याने साक्षीला मारण्याचा कट रचला. त्याने उंदीर मारण्याचे औषध पाण्यात टाकून ते पाणी साक्षीला पिण्यासाठी देत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर साक्षीने लोणीकंद पोलिसांत धाव घेत पतीसह सासरकडील मंडळीविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी साक्षीचा पती आरोपी हनुमंत, सासऱ्यांसह इतर ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हनुमंतला अटक केली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Pune Lonikand Police Station
Farmers Protest: केंद्रासोबतची बोलणी फिस्कटली, शेतकरी पुन्हा आक्रमक; जेसीबी-पोकलेन घेऊन आज दिल्लीकडे कूच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com