Sangli Crime : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचं 'सांगली' कनेक्शन; पोलिसांच्या छापेमारीत 100 कोटींचे ड्रग्ज जप्त

Pune Police Seized Narcotics In Sangli: पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचं 'सांगली' कनेक्शन समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी सांगलीत छापेमारीत १०० कोटी रुपयाचं ड्रग्ज जप्त केलं आहे.
Pune Police
Pune Police Saam Tv
Published On

अक्षय बडवे

Police Seized Narcotics In Sangli

काही दिवसांपूर्वी पुण्यात अमली पदार्थ तस्करीचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. तेव्हापासून पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचे विविध कनेक्शन समोर येत (Seized Narcotics In Sangli) आहेत. आता या प्रकरणाचं सांगली कनेक्शन समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी सांगली जिल्ह्यात छापेमारी केली. (Latest Crime News)

या छापेमारीत त्यांनी शंभर कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील ड्रग्जसाठ्यावर छापेमारी केली. तेथे पन्नास किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. पुण्यात तयार होणाऱ्या ड्रग्जचे थेट सांगली जिल्ह्यातील कुपवाड या ठिकाणी संबंध लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ड्रग्ज प्रकरणात इंजिनिअर तरूण

आज सकाळपासून पुणे पोलिसांनी सांगलीतील कुपवाडात छापेमारी केली आहे. ड्रग्ज बनवणाऱ्या काही इंजिनिअर तरूणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं (Pune Police Seized Narcotics In Sangli) आहे. पुणे शहराचा आता उडता पंजाब होताना दिसत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० फेब्रुवारी रोजी दिल्लीतून तब्बल १८०० कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं.

पुण्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा होत आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी काही तस्करांना अटक देखील केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरण समोर आलं (Narcotics In Sangli) होतं. त्यानंतर आता ही प्रकरण समोर येत आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद देखील घेतली होती.

पाच दिवसातील पुणे पोलिसांची कारवाई

पुणे पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी पेठेत छापेमारी केली होती. तेव्हा त्यांनी २ किलो एमडी जप्त (Narcotics) केलं होतं. १९ फेब्रुवारीच्या छापेमारीत विश्रांतवाडी येथील गोदामातून १०० कोटीपेक्षा अधिक किंमतीचं ५५ किलो एमडी जप्त केलं होतं. २० फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात छापा टाकला होता. तेव्हा तब्बल ११०० कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.

पुणे पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी थेट दिल्लीत कारवाई केली होती. या छापेमारीत त्यांनी ८०० कोटी रुपयांचं ४०० किलो एमडी जप्त केलं (Pune crime) होतं. दिल्लीत २१ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांच्या आणखी एका कारवाईमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ६०० किलो एमडी जप्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com